Tuesday, May 19, 2026
HomeSportरत्नागिरी कोकण चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये कोल्हापूर संघ उपविजेता

रत्नागिरी कोकण चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये कोल्हापूर संघ उपविजेता

बालिंगा : प्रतिनिधी.(मोहन कांबळे)
दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान, रत्नागिरी यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारी भव्य दिव्यांग क्रिकेट स्पर्धा दि. १६ व १७ एप्रिल २०२६ रोजी खेड, जि. रत्नागिरी येथे उत्साहात संपन्न झाली. या तिरंगी स्पर्धेमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित रत्नागिरी, कोल्हापूर आणि सोलापूर या संघांचा सहभाग होता. दिव्यांग क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या मुख्य उद्देशाने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. क्रिकेट रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेतला.कोल्हापूर संघामध्ये जगदीश शिंगाडे (कर्णधार), उत्तम चौगुले (उपकर्णधार), विकास अनुसे, भिकाजी कांबळे (विकेटकीपर), शाहरुख तांबोळी, संजय पाटील, राजू सुतार, मोहम्मद हाफिज मुजावर, सिद्धेश पाटील, राहुल सुतार, बाबुराव पाटील, स्वरूप पाटील आणि प्रभाकर पाटील या दिव्यांग खेळाडूंची निवड करण्यात आली होती.
स्पर्धेची सुरुवात रत्नागिरी आणि कोल्हापूर संघातील सामन्याने झाली. प्रथम फलंदाजी करत कोल्हापूर संघाने ८५ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात रत्नागिरी संघ ५० धावांत गारद झाला. अशाप्रकारे एकतर्फी विजय मिळवत कोल्हापूर संघाने थेट अंतिम फेरीत प्रवेश केला.अंतिम सामन्यात कोल्हापूर संघाने सोलापूर संघासमोर ६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रंगत कायम राहिली. अखेरीस सोलापूर संघाने दोन गड्यांच्या मोबदल्यात विजय मिळवत विजेतेपद पटकावले, तर कोल्हापूर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.रत्नागिरी विरुद्धच्या सामन्यात अवघ्या २१ चेंडूत ६४ धावांची तुफानी खेळी करणाऱ्या कोल्हापूरच्या राहुल सुतार यांना “मॅन ऑफ द मॅच” पुरस्काराने गौरविण्यात आले.ज्योतीराम जाधव (जेके कन्स्ट्रक्शन) तसेच एन. डी. वायंगडे (सदस्य, जिल्हा परिषद कोल्हापूर) यांनी कोल्हापूर संघातील सर्व खेळाडूंना संपूर्ण क्रिकेट किट प्रदान करून मोलाचे सहकार्य केले. कोल्हापूर दिव्यांग क्रिकेट संघाच्या व्यवस्थापकाची जबाबदारी अतुल धनवडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. तर दिव्यांग सेना संघटना जिल्हाध्यक्ष उत्तम चौगुले.यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular