बालिंगा : मोहन कांबळे
बालिंगा येथील कोल्हापूर गगनबावडा मार्गावर भोगावती नदीवरील नवीन पूल यंदाही पावसाळ्यापूर्वी अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. दोन्ही पिलर वरील गर्डर ठेवण्याचे कामाला सुरुवात झाली असून एकूण दहा गर्डर ठेवण्यात येणार आहेत.पूलाचे काम संथ गतीन सुरू होते. मात्र जिल्हाधिकारी यांनी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सुचना दिल्यानंतर जलद गतीने कामास सुरुवात करण्यात आली . या ठिकाणी सर्व पिलर पूर्ण आहेत. एकूण १२३ मीटरचा पूल होणार आहे. जुना पूल १०२.५ मीटर होता. एकूण २१ मीटरने पुलाची लांबी वाढविण्यात आली आहे. एप्रिल मे पर्यंत पूल बांधून पूर्ण करण्याचे आश्वासन ठेकेदारांनी दिले होते. मात्र पावसाळा तोंडावर आल्याने शुक्रवार पासून १४० टनी गर्डर पिलर वर ठेवण्याचे काम सुरू झाले आहे. एकूण दहा गर्डर ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर स्लॅप जोडण्यासाठी वेळ लागणार आहे.लवकरात लवकर पूल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आसल्याचे राष्ट्रीय महामार्ग कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांनी सांगितले. दरम्यान युद्धजन्य परिस्थितीचा फटका ही पुलाला बसत आहे. दररोज २५ मशिनरी असून दिवसाला दोन हजार लिटर डिझेल लागते. दोनशे टनाच्या दोन लॉन्चिंग क्रेन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात डिझेल लागत आहे. डिझेल मिळत नसल्यामुळे ठेकेदार व कर्मचारी अनेक पंपावर शोधाशोध करून डिझेल प्राप्त करण्याचे काम करत आहेत. अशी माहिती संदीप यादव यांनी दिली आहे.एकंदरीत
पावसाळ्यापूर्वी पूल पूर्ण होण्याची नागरिकांची आशा अपूर्णच राहणार आहे.त्यामुळे यावर्षीही 140 वर्षाचा इतिहास असणाऱ्या जुन्या ब्रिटिश कालीन पुलाचा आधार घ्यावा लागणार हे मात्र नक्की.