Monday, June 8, 2026
HomeHealth & Fitnessआमदार चंद्रदिप नरके यांच्या हस्ते खुपीरे ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक TrueNat मशीनचे उद्घाटन;...

आमदार चंद्रदिप नरके यांच्या हस्ते खुपीरे ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक TrueNat मशीनचे उद्घाटन; क्षयरोग निदानाला मिळणार गती

दोनवडे प्रतिनिधी :
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण मोहिमेअंतर्गत ग्रामीण रुग्णालय, खुपीरे येथे प्रयोगशाळा विभागात नव्याने उपलब्ध झालेल्या अत्याधुनिक TrueNat मशीनचे उद्घाटन करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते संपन्न झाले. या मशीनमुळे क्षयरोगासह विविध संसर्गजन्य आजारांचे निदान अधिक जलद, अचूक आणि प्रभावी पद्धतीने करता येणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवेचा मोठा लाभ मिळणार आहे.

या प्रसंगी आमदार चंद्रदीप नरके यांनी ग्रामीण भागात आरोग्य सुविधा अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांना वेळेत निदान व उपचार मिळणे आवश्यक असून TrueNat मशीनमुळे क्षयरोग निदान प्रक्रियेला मोठी गती मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाला जिल्हा क्षयरोग अधिकारी (DTO) डॉ. वेदक, तालुका आरोग्य अधिकारी (THO) डॉ. मदने, डॉ. रेश्मा पाटील (RMO, CPRH कोल्हापूर),ग्रामीण रुग्णालय खुपीरेच्या वैद्यकीय अधीक्षक मृणालिनी पाटील, विठ्ठल पाटील, डॉ. धनंजय पाटील,प्रयोगशा तंत्रज्ञ अविनाश पिसाळ यांच्यासह श्री संजय सखाराम पाटील,कुंभी कारखान्याचे संचालक संजय बळवंत पाटील, श्री तानाजी पाटील (साबळेवाडी),शिवाजी गुरव, नितीन भोसले, ग्रामीण रुग्णालय खुपीरे येथील अधिकारी व कर्मचारी, RBSK विभाग तसेच जिल्हा क्षयरोग विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामीण रुग्णालयात सुरू झालेल्या या अत्याधुनिक सुविधेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना क्षयरोग व इतर संसर्गजन्य आजारांचे तपासणी अहवाल कमी वेळेत उपलब्ध होऊन उपचार प्रक्रियेला मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular