दोनवडे : प्रतिनिधी
स्मार्ट मीटर बसवण्यासाठी आलेल्या महावितरण कर्मचारी व साबळेवाडी ग्रामस्थ यांच्यात वादावादी झाली. गावातील कुठल्याही नागरिकाची परवानगी नसताना स्मार्ट मीटर बसवणे चुकीचे आहे ही महावितरण कंपनीची अरेरावी आहे अशा शब्दात ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांची कान उघाडणी केली.
नुकत्याच झालेल्या साबळेवाडी येथील गाव सभेमध्ये गावांमध्ये स्मार्ट मीटर बसवायचे आहे म्हणून कुठलाही ठराव झालेला नाही. महावितरण कंपनीने लेखी सूचना देऊन सुद्धा सोमवार पासून साबळेवाडी मध्ये स्मार्ट मीटर बसवायचे असा चुकीचा निर्णय दिलेला आहे गावातील कुठल्याही नागरिकाची परवानगी नसताना सुद्धा मीटर बसवायची हे चुकीचे आहे फक्त आम्ही काल गाव सभेला हजर असणाऱ्या नागरिकांनी सांगितले की तुम्ही नागरिकांची किंवा तुम्ही जर ग्राहकांची दिशाभूल करून जे मिटर बसविल्यात ते कसे चालतात ते बिल कसे येते बघून आम्ही निर्णय घेतो असे सांगितले. असे असताना सुद्धा वरील मेसेज चुकीचा पाठवलेला आहे.
सोमवारपासून साबळेवाडी मध्ये कुठल्याही ग्राहक, नागरिकांनी आपल्या घरात स्मार्ट बसवून घेऊ नये तरी कुणी आले तर त्यांना मीटर बसवण्यास परवानगी देऊ नये असा ठराव ग्रामपंचायतीला दिला आहे आणि परत देत आहे. तेव्हा जबरदस्तीने कोणाचेही मीटर बसवू नये आणि ग्राहकाने सुद्धा त्यांना बसवायला परवानगी देऊ नये असे आवाहन शरद जोशी शेतकरी संघटना संस्थापक जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील व ग्रामपंचायत साबळेवाडी व गावातील नागरिक यांनी केले आहे.