Friday, June 12, 2026
HomePoliticalआ. सतेज पाटलांची एकाकी झुंज गोकुळवरचे प्राबल्य कायम असावे यासाठी प्रयत्न

आ. सतेज पाटलांची एकाकी झुंज गोकुळवरचे प्राबल्य कायम असावे यासाठी प्रयत्न

कोल्हापूर / दोनवडे : श्रीकांत पाटील
कोल्हापूर जिल्हा उत्पादक संघ (गोकुळ) यासाठी निवडणूक लागली आहे अनेक वर्षे कोल्हापूर जिल्ह्याचे प्राबल्य असलेल्या सत्ता केंद्रासाठी महायुती विरोधात आ. सतेज पाटील एकाकी झुंज देत आहे महायुतीमध्ये मोठे दिगज आहेत. अनेक वर्षे कोल्हापूर जिल्ह्याचे प्राबल्य असलेल्या सत्ता केंद्रासाठी महायुती विरोधात आमदार सतेज पाटील एकाकी झुंज देत आहे आता जवळचे मित्र सोडून आपला सवता सुभा मांडला आहे. काही कालावधी वगळता आजपर्यंत गोकुळवर माजी आमदार महादेवराव महाडिक यांचीच सत्ता होती.

कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र
!कोल्हापूर जिल्हा उत्पादक संघ तथा गोकुळ व कोल्हापूर मध्यवर्ती बँक यांच्यावर आपलेच अस्तित्व असावे यासाठी अनेकांनी प्रयत्न केले स्थापनेपासून आनंदराव पाटील-चुयेकर यांच्याच नेतृत्वावर अनेकांनी गोकुळ वर सत्ता उपभोगली. सहकार म्हणजे काय? हे आनंदराव पाटील (चुयेकर) व सहकार नेते एस आर पाटील यांनी आपल्या कार्यातून दाखवले. आज उलगडा करण्याचे कारण सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे ज्या ज्या वेळी राज्य सरकारने शेतकरी विरोधी भूमिका घेतली त्या विरोधी या नेत्यांनी प्रखर विरोध केला आज सहकार मधील नेताच राहिला नाही.

आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत तत्कालीन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार पी. एन. पाटील व अरुण नरके होते त्यांच्या नेतृत्वाखालील ‘मनपा’ गटाचेही निर्विवाद वर्चस्व होते; मात्र सहा वर्षांपूर्वी गोकुळला मल्टिस्टेट करण्याचा प्रस्ताव पुढे आल्यानंतर या विषयावरून मोठे राजकीय वादळ निर्माण झाले. आमदार सतेज पाटील यांनी या प्रस्तावाविरोधात जिल्हाभर जनमत तयार केले.
महायुतीमध्ये मोठे दिगज आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे मुख्य सत्ता केंद्र असलेल्या गोकुळ साठी आ. सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापन केली आहे त्या माध्यमातून ते पुढे आले आहेत. जिल्ह्याचे प्रमुख सत्ताकेंद्र असणाऱ्या गोकुळवर आपलेच प्राबल्य असावे यासाठी महायुती व राजर्षी समविचारी आघाडी यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. गोकुळच्या सत्तेसाठी महायुती विरुद्ध राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी असा सामना होण्याची चिन्हे आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक हे दिग्गज एकत्र आले आहेत.

.आमदार सतेज पाटील हे पक्षनिरपेक्ष समविचारी आघाडीच्या माध्यमातून एकाकी झुंज देत आहेत. सत्तेत नसताना जे येतील त्यांना बरोबर घेऊन जायचं अशी आमची भूमिका आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular