Friday, June 12, 2026
HomeSocialखुपीरेतील ज्येष्ठ सहकार नेते सर्जेराव जोती पाटील (नाना) यांचे निधन

खुपीरेतील ज्येष्ठ सहकार नेते सर्जेराव जोती पाटील (नाना) यांचे निधन

दोनवडे प्रतिनिधी:

करवीर तालुक्यातील खुपीरे येथील श्रीपत समूहाचे नेते तसेच कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव जोती पाटील (नाना) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

सर्जेराव पाटील (नाना) यांनी सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत अनेक वर्षे जनसंपर्क व नेतृत्वाच्या माध्यमातून कार्य केले. त्यांच्या शांत, संयमी आणि लोकाभिमुख स्वभावामुळे त्यांना परिसरात विशेष मान-सन्मान होता.

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत असून, नातेवाईक, मित्रपरिवार व समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,  सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन दिनांक 14 जून रोजी सकाळी नऊ वाजता खुपिरे येथे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular