Saturday, July 11, 2026
HomeEducationअतिवृष्टीमुळे पासार्डे शाळेची जुनी संरक्षक भिंत ढासळली; शाळा सुटल्यानंतर भिंत ढासळली मोठा...

अतिवृष्टीमुळे पासार्डे शाळेची जुनी संरक्षक भिंत ढासळली; शाळा सुटल्यानंतर भिंत ढासळली मोठा अनर्थ टळला…

बहिरेश्वर प्रतिनिधी..
करवीर तालुक्यातील मौजे पासार्डे येथे विद्या मंदीर पासार्डे शाळेची जुनी संरक्षक भिंत शनिवारी दुपारी अतिवृष्टीमुळे ढासळली..यात कोणतीही जिवितहानी झाली नाही..कठड्याशेजारी पार्किंग केलेल्या ट्रॅक्टर व ट्राॅलीवर आर सी सी भिंत ढासळल्यामुळे थोडे नुकसान झाले.तसेच महावितरणचा पोल मोडला यामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला..महावितरण कंपनीकडून तात्काळ कामाची सुरुवात करण्यात आली व वीजपुरवठा सुरळीत चालू केला.संरक्षित भिंत ढासळल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य सौ रेखाताई प्रकाश मुगडे यांनी शाळेस भेट दिली.सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मुगडे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला माहिती दिली यानंतर अधिकारी वर्गानीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तात्काळ काम सूरू करण्याचे आदेश ठेकेदाराला दिले..यावेळी सरपंच विष्णू पाटील, उपसरपंच शरद पाचाकटे,सनी पाटील,दिलीप सावंत,शरद पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते..

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular