Tuesday, August 25, 2026
HomeSocialसद्गुरू बाळूमामा यांच्या ६०व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य अखंड हरिनाम महासप्ताहाला प्रारंभ.

सद्गुरू बाळूमामा यांच्या ६०व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य अखंड हरिनाम महासप्ताहाला प्रारंभ.

मुदाळतिट्टा/प्रतिनिधी :
महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्र,गोवा,कोकण व अन्य राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड )येथील सद्गुरू बाळूमामा यांच्या ६०व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य अखंड हरिनाम महासप्ताहाला मंगळवार, दि. २५ ऑगस्ट रोजी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. पुण्यतिथीनिमित्त मानद अध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले यांच्या हस्ते अभिषेक, समाधी पूजन आणि वीणा पूजन करण्यात आले.

सप्ताहानिमित्त सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बाळूमामांच्या पुण्यतिथीनिमित्त मंदिरातील गाभारा, समाधी आणि मूर्तीची विविध फुले व फळांनी आकर्षक आरास करण्यात आली आहे. समाधी पूजन व महाआरतीनंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular