Sunday, September 6, 2026
HomePoliticalबालिंग्यात संतोष पंडित यांच्या वक्तव्याचा भाजपकडून जाहीर निषेध

बालिंग्यात संतोष पंडित यांच्या वक्तव्याचा भाजपकडून जाहीर निषेध

बालिंगा, ता. करवीर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबद्दल संतोष पंडित यांनी केलेल्या कथित अशोभनीय व असंस्कृत वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने बालिंगा येथे जाहीर निषेध करण्यात आला. तसेच महिला वर्गाचा अपमान केल्याचा आरोप करत संतोष पंडित यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला.

भाजपा जिल्हा सरचिटणीस अमर मारुतराव जत्राटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाची सुरुवात बालिंगे ग्रामपंचायत कार्यालयापासून झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर संतोष पंडित यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून संताप व्यक्त करण्यात आला.

यावेळी संतोष पंडित यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. या संदर्भात पोलिसांना निवेदन देण्यात आले असून, निषेध मोर्चासाठी पूर्वपरवानगी घेण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

निषेध मोर्चात अनिल गायकवाड, युवराज जत्राटे, उदय गोंधळी, किरण सूर्यवंशी, रघुनाथ कांबळे, अशोक बलुगडे, विनायक व्यसनेकर, संजय आयवाळे, राजू देवकर, अमित वाडकर, अजित गोंधळी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular