कोल्हापूर, दि. ७ सप्टेंबर : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी लि., कोल्हापूरच्या हिरक महोत्सवी वर्षात पदार्पणानिमित्त संस्थेच्या सभासदांच्या मुला-मुलींसाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरिता सुसज्ज अभ्यासिका व ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासिका व ग्रंथालयाचा उद्घाटन समारंभ मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयात, सि.स. नं. ११४९ (अ), ई वॉर्ड, साईक्स एक्स्टेंशन, शाहूपुरी, कोल्हापूर येथे होणार आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन संजय श्रीपतराव शिंदे यांनी दिली.
संस्थेच्या वतीने सभासदांच्या मुलांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी आवश्यक पुस्तके उपलब्ध करून देण्याचा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून राबविला जात आहे. या उपक्रमाचा लाभ घेत आतापर्यंत सभासदांची ५० पेक्षा अधिक मुले शासकीय सेवेत वर्ग-१ व वर्ग-२ पदांवर निवड होऊन कार्यरत आहेत.
सभासदांच्या मुलांना केवळ पुस्तके उपलब्ध करून न देता, त्यांना शांत व अभ्यासपूर्ण वातावरणात तयारी करता यावी, या उद्देशाने अभ्यासिकेची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात आली आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने साकारण्यात आलेली ही अभ्यासिका आवश्यक पुस्तकांसह सुसज्ज असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
सभासदांच्या मुला-मुलींनी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या अभ्यासिका व ग्रंथालय सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे व्हा. चेअरमन जयकुमार रेळेकर, संचालक नंदिप मोरे, श्रीकांत चव्हाण, रविंद्र जरळी, सुनील पाटील, साताप्पा मगदूम, सुधाकर कांबळे, सचिन गुरव, उत्तम वावरे, रणजित पाटील, मुजम्मिल नावळेकर, अमर पाटील, जितेंद्र वसगडेकर, राहुलराज शेळके, सुरेश सुतार, अजय शिंदे, सरदार दिंडे, सरोजिनी कोरी व सोनाली गुरव तसेच तज्ञ संचालक प्रविणकुमार पाटील व स्वप्निल घस्ते यांचे सहकार्य लाभत आहे.
संस्थेचे मार्गदर्शक एम. आर. पाटील, विश्वास साबळे, महावीर सोळांकूरे, एम. एम. पाटील, के. आर. किरूळकर, राजाराम वरूटे, राजीव परीट, रविकुमार पाटील, मनोहर भाट, सात्ताप्पा मोहिते, अजित मगदुम, शांताराम माने, विजय टिपुगडे, प्रतिभा शिर्के, एन. डी. पाटील, अनिल आवळे, किरण मगदुम, दगडू परीट व कपिल पाटील यांचेही मार्गदर्शन मिळत आहे.