Wednesday, September 23, 2026
HomeSocial जे.बी. स्पोर्ट्सतर्फे गणेशोत्सवात आरोग्य शिबिर, महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

 जे.बी. स्पोर्ट्सतर्फे गणेशोत्सवात आरोग्य शिबिर, महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

 

पन्हाळा प्रतिनिधी : पन्हाळा येथे गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी जे.बी. स्पोर्ट्सच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमांना गणेशभक्त व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दिवसभर आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तपासणीनंतर गरजेनुसार निदान करून नागरिकांना मोफत औषधोपचार करण्यात आले. या माध्यमातून जे.बी. स्पोर्ट्सने सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवेचा उपक्रम राबविला.

सकाळी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी मिलिंद बांदिवडेकर यांच्या हस्ते सुमधुर भजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर श्री गणपतीची आरती भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.

आरतीस पन्हाळा नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती जयश्री पवार, माजी नगराध्यक्षा रूपाली धडेल, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल, शिवसेनेचे शहराध्यक्ष मारुती माने, नगरसेविका तेजस्विनी गुरव, प्रतीक्षा वराळे, तसेच नगरसेवक प्रदीप गवळी, सखाराम काशीद, तुकाराम भाडेकर, शहाबाज मुजावर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी श्री महागणपतीचे दर्शन घेऊन आरतीचा लाभ घेतला.

यानंतर आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा सुमारे ६०० ते ७०० गणेशभक्तांनी लाभ घेतला. भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संगम घडविणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक उपक्रमांसह गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल जे.बी. स्पोर्ट्सचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, गणेशभक्त, नागरिक आणि कार्यकर्त्यांचे जे.बी. स्पोर्ट्सच्या वतीने अक्षय सोरटे व शिवकुमार सोरटे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular