Friday, October 2, 2026
HomePoliticalगडहिंग्लज-आजरा तालुक्यात प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा संस्थात्मक संपर्क दौरा, कौस्तुभ गावडे यांच्या...

गडहिंग्लज-आजरा तालुक्यात प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा संस्थात्मक संपर्क दौरा, कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व संस्थाचालकांशी संवाद

गडहिंग्लज/आजरा, दि.  02ऑक्टोबर  २०२६ : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकमित्र श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराला वेग आला असून, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी गडहिंग्लज व आजरा तालुक्याचा दौरा करून विविध शैक्षणिक संस्थांना सदिच्छा भेटी दिल्या.
या दौऱ्यात प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी संस्थाचालक, शिक्षक तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांशी संवाद साधला. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करताना श्री. कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीबाबतही त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
दौऱ्यादरम्यान संस्थापक मा. अशोक अण्णा चराटी, मा. जयवंतराव शिंपी (आजरा), मा. किसनराव कुराडे, मा. अनिल कुराडे, डॉ. सतीश घाळी (गडहिंग्लज), सौ. प्रतिभाताई चव्हाण (महागाव), मा. हेमंत कोलेकर, भिकाजीराव अण्णा दळवी तसेच प्रकाश देसाई (नेसरी) यांच्यासह विविध शैक्षणिक संस्थांचे संस्थापक, पदाधिकारी व शिक्षक बंधू-भगिनी यांच्याशी भेटीगाठी झाल्या.
शिक्षकांच्या प्रश्नांवर सातत्याने संवाद, संघटनात्मक संपर्क आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यावर या दौऱ्यात भर देण्यात आला. संस्थाचालक व शिक्षकांनीही आपल्या विविध प्रश्नांबाबत प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्याशी चर्चा केली.
या संपर्क दौऱ्यात संस्थेचे आजीव सेवक श्री. अजित देसाई, श्री. एल. के. पाटील सर, प्राचार्य एस. एन. देसाई, प्राचार्य पंडित पाटील, मुख्याध्यापक संभाजी शेवाळे, आजरा तालुका प्रमुख दामोदर यादव, ग्रंथपाल सुहास शिंदे आणि अशोक महाजन यांची उपस्थिती होती.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये संस्थाचालक व शिक्षकांशी संपर्क वाढविण्याच्या दृष्टीने या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular