Sunday, October 11, 2026
HomeEducationकळे येथे आर. के. नारायण यांच्या जयंतीनिमित्त पोस्टर प्रेझेंटेशन व व्याख्यान

कळे येथे आर. के. नारायण यांच्या जयंतीनिमित्त पोस्टर प्रेझेंटेशन व व्याख्यान

कळे : श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ, पणुत्रे संचलित विठ्ठलराव पाटील महाविद्यालय (कला, विज्ञान व वाणिज्य), कळे येथील इंग्रजी विभागातर्फे भारतीय इंग्रजी साहित्यिक आर. के. नारायण यांच्या जयंतीनिमित्त पोस्टर प्रेझेंटेशन आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. ‘भारतीय इंग्रजी कवी : जीवन, साहित्यकृती आणि साहित्यिक योगदान’ हा पोस्टर प्रेझेंटेशनचा मुख्य विषय होता. प्रमुख वक्ते प्रा. प्रमोद काळे यांनी ‘इंग्रजी विषयाचे महत्त्व आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी इंग्रजी भाषेची आवश्यकता’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सहाय्यक प्राध्यापिका अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. बी. गोंडे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रा. सुनील पाटील यांनी केले, तर प्रा. व्ही. पी. कांबळे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular