Monday, October 26, 2026
HomePoliticalगणपूर्तीची अट फक्त पहिल्या सभेलाच, त्यामुळे शशिकांत पाटील चुयेकर यांचा अध्यक्ष होण्याचा...

गणपूर्तीची अट फक्त पहिल्या सभेलाच, त्यामुळे शशिकांत पाटील चुयेकर यांचा अध्यक्ष होण्याचा मार्ग सुकर.

कोल्हापूर/मोहन कांबळे:

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ म्हणजेच गोकुळ दूध संघाचा निकाल नुकताच लागला असून त्यामध्ये १३/१२ असा निकाल लागलेला आहे. 

    परंतु सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्र मध्ये एकच विषय गाजत आहे गोकुळची पहिली सभा ज्यावेळी होणार त्यावेळी गणपुर्ती कर ता १४ संचालक यांना उपस्थित रहावे लागणार आहेत.

      परंतु पहिल्या सभेला जे संचालक गैरहजर राहतील त्या सर्व संचालकांची माहिती राज्य सहकार खात्यात कळविली जाणार असून त्यानंतरअध्यक्ष पदासाठी दुसरी सभा होईल, त्या सभेत गणपुर्तीची अट शिथिल होवून सतेज उर्फ बंटी पाटील यांचे गटाचा अध्यक्ष होण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

     जर विरोधी संचालक सलग तिसरे सभेसही गैरहजर राहिले तर त्यांचे संचालक पद रद्द होणार असलेने पोट नियमांचा जास्त विचार केला जाणार नाही आणि सहकारात काम करीत असलेले नामदार हसन मुश्रीफ व आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके , नामदार पालकमंत्री आबीटकर असा कोणताही वेगळा विचार करणार नाहीत त्यामुळे पहिल्या सभेस सर्व २५ नुतन संचालक उपस्थित राहतील असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular