बोरगाव : बोरगाव हायस्कूल, बोरगाव येथील इयत्ता दहावीच्या २००१ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल २५ वर्षांनंतर मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटल्यानंतर एकत्र आलेल्या या मित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत पुन्हा एकदा शाळेच्या रम्य विश्वात फेरफटका मारला.
कालांतराने प्रत्येकाच्या चेहऱ्यात आणि व्यक्तिमत्त्वात बदल झाल्यामुळे सुरुवातीला सर्वांनी आपापली ओळख करून दिली. त्यानंतर काही माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करत शाळेतील आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांसोबत घालवलेले अविस्मरणीय क्षण यांना उजाळा दिला. काहींनी शालेय जीवनातील मजेशीर किस्से सांगितल्यामुळे हास्याचे फवारे उडाले आणि संपूर्ण वातावरण आनंदाने भरून गेले.
कार्यक्रमात विविध फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर रंगलेल्या संगीत रजनीच्या मैफिलीने कार्यक्रमात आणखी रंगत आणली. काही मित्रांनी आपल्या गायनकलेचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. गप्पा, हास्यविनोद, खेळ आणि संगीत यांच्या माध्यमातून सर्वांनी जुन्या मैत्रीचा मनमुराद आनंद लुटला. क्षणभर का होईना, सर्वजण पुन्हा २५ वर्षे मागे जाऊन शालेय जीवनातील त्या निरागस आणि अविस्मरणीय आठवणींमध्ये रमून गेले.
या स्नेहमेळाव्याचे सर्वांत महत्त्वाचे आणि सामाजिक दृष्टिकोनातून उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन *‘आधार फाउंडेशन’* या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ केला. केवळ स्नेहमेळाव्यापुरते एकत्र न राहता समाजाप्रती आपली बांधिलकी जपण्याचा स्तुत्य संकल्प या मित्रपरिवाराने केला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देणे, तसेच भविष्यात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणे हा या फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे. फौंडेशनसाठी काम करण्यासाठी *सचिन पाटील, निलेश शिंदे, अजित पाटील, विकास गिरीगोसावी, उत्तम धोत्रे, दशरथ यादव, जयदीप साळुंखे आणि एकनाथ यादव* हे पुढे होऊन सरसावले व सर्वाना बरोबर घेऊन हे फौंडेशन उत्तमरीत्या चालवू असे आश्वासन दिले. सर्व जणांनी त्यांना पाठिंबा दिला. मैत्रीच्या नात्याला सामाजिक कार्याची जोड देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी विशेष प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाचे प्रभावी आणि खुमासदार *सूत्रसंचालन प्रा. अरुण पाटील* यांनी केले. या स्नेहमेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी २००१ बॅचमधील सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे नियोजन व परिश्रम घेतले.
या स्नेहमेळाव्यास *विकास गिरी, अनिल मोरे, सिद्धार्थ पोळ, अजितकुमार पाटील, राहुल यादव, प्रतापराव नांगरेपाटील, संजय वाटेगावकर, अधिक गावडे, उत्तम धोत्रे, दिग्विजय शीद, सत्यजीत पाटील, धनाजी शिंदे, संदीप वाटेगावकर, सुजितकुमार वाटेगावकर, प्रदीप मोरे, अमोल फार्णे, विकास पवार, अरुण पाटील, जयप्रकाश खोत, राहुल पाटील, अश्विनकुमार पाटील, पृथ्वीराज गायकवाड, निलेश यादव, प्रमोद सलगर, शिवाजी सलगर, संदीप देसाई, जयदीप साळुंखे, शिवाजी पाटील, शिवाजी कुंडलिक पाटील, संजय सलगर, सचिन पाटील, शंकर पाटणकर, अभिजीत वाझे, गोपाल चोखले, संग्राम साळुंखे, नितीन खोत, निलेश शिंदे, सुखदेव बोराडे, जयंत शिर्के, पृथ्वीराज पाटील, विजय पाटील, विनायक घाडगे, विनोद डिगे, एकनाथ यादव, प्रताप पाटील, मनोज पाटील, दशरथ यादव, धनंजय नायकवडी, जितेंद्र साटपे, सचिन कदम, सचिन सत्रे, अधिक चव्हाण, राहुल शिंदे, सचिन चव्हाण, विक्रम पवार तसेच मुलींमध्ये माया यादव, विद्या डांगे, किरण पाटील, तेजस्विनी यादव, अश्विनी जाधव, सीमा धोत्रे, शिला धोत्रे, वृषाली देसाई, सुप्रिया पाटील उपस्थित होत्या.