दोनवडे प्रतिनिधी : जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार स्वर्गीय कै. पी. एन. पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त खुपीरे येथील नंदिवाले वसाहतीमध्ये आयुष्यमान गोल्डन कार्ड (आभा) वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नागरिकांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ सहज मिळावा, या उद्देशाने लाभार्थ्यांना गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाला खुपीरे पंचायत समिती सदस्या सौ. आशा प्रविण पाटील यांच्यासह, विठ्ठल सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन आनंद कृष्णा पाटील, संचालक प्रवीण ऊर्फ बबलू पाटील, बजरंग दूध संस्थेचे चेअरमन दत्तात्रय शिवाजी पाटील, माजी ग्रामपंचायत उपसरपंच रणजित पाटील, ग्रामपंचायत सदस्य भगवान हरळे, धनाजी पाटील, कृष्णात बंगे, सर्जेराव शिंदे, सरदार पाटील, वसंत पाटील, बळवंत जांभळे यांच्यासह विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी आणि पी. एन. पाटील प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत बजरंग दूध संस्थेचे संस्थेचे सचिव संदीप वाळवेकर यांनी केले, तर मनोगत माजी उपसरपंच युवराज पाटील यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे नागरिकांना आरोग्य योजनांबाबत माहिती मिळून शासनाच्या लाभदायी योजनांचा फायदा घेण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.