मुदाळतिटटा/प्रा.शिवाजी खतकर:
महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्र,गोवा,कोकण व अन्य राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड )येथील सद्गुरु बाळूमामांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार दि.२५ आॅगष्ट ते सोमवार दि.१सप्टेंबर अखेर भव्य अखंड हरिनाम महासप्ताहाचे आयोजन केले आहे. सदर सप्ताह विविध धार्मिक कार्यक्रमांनी संप्पन्न होणार आहे.
नित्याचे कार्यक्रम असे पहाटे ४ ते ५ वा.समाधी पुजन,सकाळी ५ ते ६ वा. काकड आरती,सकाळी ७.३० ते ११.३०वा .ज्ञानेश्वरी व संत बाळूमामा विजय ग्रंथ पारायण, दुपारी ३ते ५.३० वा.राम कृष्ण हरी जप व गाथा भजन व हरीपाठ, सायंकाळी ६ ते ७ वा.प्रवचन,रात्रौ ९ ते ११ वा.हरिकिर्तन,रात्रौ ११ ते पहाटे ४ वाजे पर्यंत हरिजागर. आदमापूर व इतर भजनीमंडळे यांची भजने,प्रवचनकार व किर्तनकार यांची प्रवचने व किर्तने होणार आहेत.
मंगळ दि.२५ रोजी सकाळी ७ वा.अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या शुभहस्ते विनापूजन संपन्न होईल.सायंकाळी ६ ते ७ या वेळेत ह.भ.प.पुर्णानंद काजवे ( कोगनोळी) यांचे प्रवचन तर रात्री ९ ते ११ या वेळेत वारकरी भूषण ह. भ. प.चैतन्य (निंबोळे)यांचे कीर्तन, बुध.
दि.२६ रोजी सायं.६ वा. वाजता ह.भ.प परमार्थ भुषण नारायण एकल (जोगेवाडी ) यांचे प्रवचन तर रात्री ९ वा. ह.भ.प. श्रीगुरु कान्होबा देहूकर यांचे कीर्तन, गुरु. दि. २७ रोजी ह.भ.प. अशोकराव कौलवकर (गारगोटी ) यांचे प्रवचन तर ह.भ.प. जयेश भाग्यवंत ( डोंबिवली) यांचे कीर्तन, शुक्र. दि. २८ रोजी ह. भ. प.भानुदास कोल्हापूरे ( ईश्वर पूर) यांचे प्रवचन तर ह. भ. चारूदत्त आफळे राष्ट्रीय किर्तनकार (पुणे) यांचे कीर्तन, शनि. दि. २९ऑगस्ट ह भ प बाबुराव पाटील (सावर्डे ) यांचे प्रवचन तर ह. भ. प. यशोधन किशन साखरे (आळंदी) यांचे कीर्तन. रवि. दि.३०ऑगस्ट ह. भ. प. वारकरी भूषण योगेश जाधव (देवाची आळंदी)यांचे प्रवचन तर ह. भ. प.भाषाप्रभू जगन्नाथ पाटील (मुंबई)यांचे कीर्तन होईल.सायंकाळी सहा ते सात बग्ग्यातील कारभा-यांचा सत्कार समारंभ संपन्न होईल.
सोम. दि ३१ आॅगस्ट रोजी ह.भ.प. इंद्रजित देशमुख याचे प्रवचन तर ह.भ. प. ज्ञानेश्वर माऊली कदम (देवाची आळंदी)यांचे किर्तन होईल.मंगळ. दि ०१ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ९:३० हभप वेदांतचार्य उदयशास्त्री (शेकीनहासूर) यांचे काल्याचे कीर्तन होईल.
सकाळी दहा नंतर दिंडी सोहळा व महाप्रसाद होऊन अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.
तरी सदगुरू बाळूमामांच्या पुण्यतिथीतील विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन सद्गुरु बाळूमामा देवालय विश्वस्त व ग्रामस्थ आदमापूर यांनी केले आहे.

