चुये दि. ११ ऑक्टोबर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी (दि. ११) चुये येथे उत्साहात पार पडला. गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून आघाडीच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह विविध राजकीय नेते, पदाधिकारी, उमेदवार आणि जिल्हाभरातील ठरावधारक व दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोकुळच्या निवडणुकीत शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या हिताचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत समविचारी आघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि ठरावधारक प्रामाणिक व स्वाभिमानी असून ते कोणाच्याही भुलथापांना बळी पडणार नाहीत, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
येत्या १८ तारखेला होणाऱ्या मतदानात मतदारांनी ‘शिट्टी’ या निवडणूक चिन्हासमोरील रकान्यात शिक्का मारून राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन करण्यात आले. साडेपाच लाख शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या भविष्याचा विचार करून समविचारी आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहनही नेत्यांनी केले.
दूध उत्पादकांच्या हितासाठी एकजुटीचा निर्धार
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दूध उत्पादकांचे हित, शेतकऱ्यांचे भविष्य आणि सहकार क्षेत्रातील पारदर्शक कारभार हे मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून प्रचाराचा शुभारंभ केल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. जिल्ह्यातील दूध उत्पादक आणि ठरावधारकांपर्यंत आघाडीची भूमिका पोहोचविण्यासाठी आगामी काळात प्रचाराला अधिक गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
दिग्गज नेत्यांसह उमेदवारांची उपस्थिती
या प्रचार शुभारंभ सोहळ्याला माजी आमदार बजरंग देसाई, सत्यजित पाटील-सरूडकर, राजूबाबा आवळे, राजीव किसनराव आवळे, गटनेते एकनाथ पाटील, राजू लाटकर, विजयराव देवणे, सत्यजित जाधव, हिंदुराव चौगले, शामराव देसाई, पी. डी. धुंदरे, ए. डी. पाटील, एम. आर. पाटील, सदाशिव चरापले, उदयानी साळुंखे, स्मिता गवळी, उमेश भोईटे, भिकाजी एकल, रणजीत पाटील, विश्वनाथ पाटील, रामराजे कुपेकर, सुभाष वाडकर, एस. के. पाटील, बबन रानगे, शशिकांत खवरे, कॉ. सम्राट मोरे, गणपतराव डोंगरे, निवास पाटील, भगवानराव जाधव, संभाजीराव देसाई, अमर पाटील-शिंगणापूरकर, प्रकाश पाटील, मोहन धुंदरे, दिग्विजय कुराडे, प्रशांत देसाई, पांडुरंग भांदिगरे, जीवन पाटील, श्रीपती पाटील, एस. बी. पाटील, आर. एस. कांबळे, डी. एस. पाटील, विश्वास दिंडोर्ले, सखाराम चव्हाण, संग्राम पाटील, सागर धुंदरे, संभाजीराव पाटणकर आदी उपस्थित होते.
याशिवाय सभापती सागर पाटील, सभापती छाया देसाई, दत्तात्रय वारके, सुयोग वाडकर, मधुकर रामाणे, डॉ. के. एन. पाटील, बाजीराव पाटील, पांडुरंग पाटील, कृष्णा पाटील, सागर कोंडेकर, विष्णुपंत एकशिंगे यांच्यासह विविध पदाधिकारी, समविचारी आघाडीचे सर्व उमेदवार, जिल्हाभरातील ठरावधारक आणि दूध उत्पादक उपस्थित होते.