Thursday, November 5, 2026
HomePoliticalपन्हाळा तालुका ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील

पन्हाळा तालुका ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील

पन्हाळा प्रतिनिधी (शहानवाज मुजावर):
पन्हाळा तालुका ॲडव्होकेटस बार असोसिएशनच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी सर्वानुमते करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी अॅड. राजेंद्र विष्णू पाटील यांची निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी अॅड. माणिक नामदेव डवंग, सेक्रेटरीपदी अॅड. बाबासो भुजंगा शेलार, जॉइंट सेक्रेटरीपदी अॅड. सागर गोपाळ हटकर, तर खजिनदारपदी अॅड. विनायक आर. मोरे यांची निवड करण्यात आली. महिला प्रतिनिधी म्हणून अॅड. इंदिरा प्रकाश भोसले यांची निवड झाली.
तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून अॅड. किरण महादेव पाटील, अॅड. समृद्धी बाजीराव चव्हाण आणि अॅड. नंदिनी कृष्णात मोरे-पाटील यांची निवड करण्यात आली.
ही निवड प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि सर्वानुमते पार पडली. नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे पन्हाळा तालुका अॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. आगामी वर्षात वकिलांच्या प्रश्नांना न्याय देण्याबरोबरच न्यायालयीन कामकाज, विधी क्षेत्रातील उपक्रम आणि संघटनेच्या विकासासाठी नवीन कार्यकारिणी प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular