कोल्हापूर :
कोल्हापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील मनेर मळा कोल्हापूर परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलीस स्टेशन कोल्हापूर चे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे.
मृत व्यक्तीच्या अंगावर कोणतेही कपडे नव्हते. तसेच त्याच्या डोक्यावर, मानेवर आणि चेहऱ्यावर खोल जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे या व्यक्तीला बेदम मारहाण करून किंवा धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. ही व्यक्ती कोण आहे, त्याची हत्या नेमकी कशी झाली आणि या घटनेमागे कोणाचा हात आहे, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.