Tuesday, May 26, 2026
HomeCrimeकासारी नदीत वृद्ध महिलेचा मृतदेह

कासारी नदीत वृद्ध महिलेचा मृतदेह

पन्हाळा प्रतिनिधी : पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे कासारी नदीमध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात  मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोलोली येथील पार्वती चंद्रकात जाधव (वय 70) या मंगळवार (दि. 26 मे 2026) रोजी सकाळी 7 वाजण्यापूर्वी कोलोली येथील कासारी नदीमध्ये मृत अवस्थेत आढळून आल्या. याबाबत कोलोली येथील जयसिंग श्रीपती पाटील (वय 58, व्यवसाय-शेती) यांनी पन्हाळा पोलिसांना वर्दी दिली.

या घटनेची नोंद पन्हाळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार फोंडे करीत असून, दाखल अंमलदार म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल राजपाल यांनी कार्यवाही केली आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular