Sunday, September 20, 2026
HomeSocialपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बालिंगा येथे मोफत डोळे तपासणी शिबिर;...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बालिंगा येथे मोफत डोळे तपासणी शिबिर; १०० हून अधिक रुग्णांना लाभ

बालिंगा प्रतिनिधी : देशसेवेला समर्पित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने तसेच सरकार ग्रुप, बालिंगा यांच्या सहकार्याने शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी बालिंगा (ता. करवीर) येथे मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहन व मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

न्याब आय हॉस्पिटल, मिरज यांच्या वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात बालिंगा तसेच परिसरातील महिला व पुरुष रुग्णांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली. डोळ्यांशी संबंधित विविध तक्रारी, दृष्टीदोष तसेच इतर समस्यांची प्राथमिक तपासणी करून रुग्णांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात आले.

शिबिरात १०० हून अधिक रुग्णांनी सहभाग घेत डोळ्यांची तपासणी करून घेतली. तपासणीनंतर उपचाराची आवश्यकता असलेल्या गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पात्र गरजू रुग्णांना मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली. आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांसाठी अशा आरोग्य शिबिरांचा मोठा फायदा होत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

यावेळी भाजपचे युवा नेते अमर जत्राटे, अक्षय कांबळे, किरण सूर्यवंशी, माजी उपसरपंच युवराज जत्राटे, अनिल जत्राटे, हर्षल चोगले यांच्यासह न्याब आय हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत मनोकर, निखिल पुराणिक, दिगंबर शिंदे तसेच बालिंगा पंचक्रोशीतील महिला-पुरुष रुग्ण आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवून गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी भविष्यातही अशाच प्रकारचे आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular