Tuesday, May 26, 2026
HomeCrimeकोलोली येथे शेतात काम करत असलेल्या महिलेचा धारदार शस्त्राने खून; पन्हाळा पोलिसांत...

कोलोली येथे शेतात काम करत असलेल्या महिलेचा धारदार शस्त्राने खून; पन्हाळा पोलिसांत गुन्हा दाखल

पन्हाळा प्रतिनिधी : तालुक्यातील कोलोली येथे शेतात काम करत असलेल्या एका महिलेचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाणे येथे अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिलेचे नाव छबुताई सर्जेराव पाटील (वय अंदाजे 55, रा. कोलोली, ता. पन्हाळा) असे आहे. त्या रविवारी (दि. 24 मे) सायंकाळी शेतात काम करत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हात व डोक्यावर गंभीर वार करून त्यांना ठार मारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना कोलोली गावातील मासुलकी नावाच्या शेतात सायंकाळी सुमारे 5.30 ते रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान घडल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी बाबासो श्रीपती पाटील (वय 50, व्यवसाय शेती) यांनी फिर्याद दिली आहे.

या घटनेप्रकरणी पन्हाळा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद झाला आहे  घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान, कोलोली परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular