Friday, April 3, 2026
HomeSportसावकर चषक पन्हाळा २०२६ : राजधानी स्पोर्ट्स अजिंक्य

सावकर चषक पन्हाळा २०२६ : राजधानी स्पोर्ट्स अजिंक्य

पन्हाळा, प्रतिनिधी :
पन्हाळा क्रिकेट क्लब यांच्या वतीने शिवछत्रपती पुरस्कार विजेते दिलीप जोशी यांच्या स्मरणार्थ आयोजित भव्य सावकर चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे दहावे पर्व उत्साहात पार पडले. पन्हाळागडावरील खोकड तलाव मैदानावर १२ ते १६ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेत राजधानी स्पोर्ट्स संघाने विजेतेपद पटकावत मानाचा चषक उंचावला.

माजी नगराध्यक्ष रवींद्र धडेल यांच्या नेतृत्वाखालील राजधानी स्पोर्ट्स संघाने अंतिम सामन्यात टीम बाजीगरचा पराभव करत अजिंक्यपद मिळवले. उमेर मुजावर यांच्या टीम बाजीगर संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.

स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी झाले होते. आयएसपीएल मान्यता लाभलेल्या या स्पर्धेला राज्यातील प्रतिष्ठेची दुसरी मोठी स्पर्धा मानले जात असल्याने देशभरातील नामांकित खेळाडूंनी सहभाग नोंदवला. पहिल्या आणि अंतिम दिवशी सामने दिवसरात्र पद्धतीने खेळविण्यात आले. निसर्गरम्य वातावरणामुळे प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळली होती.

उपांत्यपूर्व फेरी निकाल :

  • राजधानी स्पोर्ट्सने हिराई फायटर्सवर २८ धावांनी विजय

  • सागर स्पोर्ट्स (बॉस ११) ने एटी स्पोर्ट्सवर २६ धावांनी मात

  • दख्खन स्पोर्ट्सने माले स्पोर्ट्सवर २४ धावांनी विजय

  • टीम बाजीगरने एल. संग्राम पाटील प्रणित भाई स्पोर्ट्सवर ७ विकेट्सनी विजय

उपांत्य फेरी :

  • राजधानी स्पोर्ट्सने दख्खन स्पोर्ट्सवर २३ धावांनी विजय

  • टीम बाजीगरने सागर स्पोर्ट्स (बॉस ११) वर ५० धावांनी विजय

अंतिम सामना :

अंतिम सामन्यात राजधानी स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करत १२० धावांचा डोंगर उभारला. अमित नाईक (२२ चेंडूत ४९ धावा) आणि एजाज कुरेशी (१६ चेंडूत २८ धावा) यांनी दमदार फलंदाजी केली. प्रत्युत्तरात टीम बाजीगरला निर्धारित षटकांत ८ गडी बाद ७६ धावाच करता आल्या. परिणामी राजधानी स्पोर्ट्सने एकतर्फी विजय मिळवत सावकर चषकावर आपले नाव कोरले.

बक्षिसे :

  • प्रथम क्रमांक : १,११,१११ रुपये (राजधानी स्पोर्ट्स)

  • द्वितीय क्रमांक : ७०,७७७ रुपये (टीम बाजीगर)

  • मालिकावीर : विकी पुजारी

  • उत्कृष्ट फलंदाज : कृष्णा गवळी

  • उत्कृष्ट गोलंदाज : खान

स्पर्धेसाठी आमदार विनय रावजी कोरे यांनी उपस्थिती दर्शवली. नगराध्यक्षा जयश्री पवार, माजी उपनगराध्यक्ष सतीश भोसले, नगरसेवक रामानंद गोसावी, नगरसेविका तेजस्विनी गुरव, बांधकाम सभापती अभिजीत गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचे यशस्वी नियोजन पन्हाळा क्रिकेट क्लबतर्फे मुनाफ मुजावर, अकिब मोकाशी, नवाज फरास, मोहसीन मुजावर, मन्नान फरास, लालू सोरटे, आशपाक गारदी, अमीर गोलंदाज, महेश कांबळे आदींनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular