कोल्हापूर, प्रतिनिधी :
माजी आरोग्य मंत्री दिग्विजय भाऊसाहेब खानविलकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नागाळा पार्क येथील निवासस्थानी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विश्वविजय खानविलकर ,राजलक्ष्मी खानविलकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
यावेळी खासदार धनंजय महाडिक,माजी खासदार संजय मंंडलीक, करवीरचे आमदार चंद्रदीप नरके , मधुरीमाराजे छत्रपती, वडणगे जिल्हा परिषद सदस्य इंद्रजीत पाटील, छत्रपती शाहू महाविद्यालयाचे अधिष्ठाता सदानंद भिसे ,रमेश भोसले,मधुकर जांभळे, संभाजी पाटील भुुुयेवाडी,बाजीराव कांबळे,सिकंदर मुजावर आंबेवाडी,आदित्य पाटील वरणगे, चंद्रकांत पाटील केर्ली, अशोक देशमुख वाघूर्डे, तानाजी माने, बाळासाहेब माने , खानविलकर प्रेमींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
युवा पिढीने त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, समाजासाठी निस्वार्थ भावनेने त्यांनी काम केले त्यांचे कार्यकर्ते जनतेला नेहमीच स्मरणीय राहिले आहे अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या
कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.