पन्हाळा प्रतिनिधी (शहानवाज मुजावर) :आ. डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या वाढदिवसानिमित्त पन्हाळा येथे नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले विशेष शिबिर रविवारी (दि. ४ ऑक्टोबर) उत्साहात पार पडले. सकाळी १०.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पन्हाळा सांस्कृतिक हॉल येथे हे शिबिर घेण्यात आले. पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती जयश्री पोवार (तोरसे) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
पन्हाळा शहरातील महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग, पथविक्रेते तसेच छोटे व्यावसायिक यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरामध्ये PM SVANidhi योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना कर्ज सुविधेबाबत मार्गदर्शन व अर्ज प्रक्रिया करण्यात आले. या योजनेत पहिल्या टप्प्यात १० हजार, दुसऱ्या टप्प्यात २५ हजार, तर तिसऱ्या टप्प्यात ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध आहेत ही लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले.
तसेच MSRTC, NCMC स्मार्ट कार्ड संदर्भातही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. पात्र महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग व इतर लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला. विविध योजनांची माहिती व आवश्यक कागदपत्रांबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा श्रीमती जयश्री पोवार (तोरसे) यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक सखाराम काशीद, लक्ष्मण कांबळे, रामानंद गोसावी, मिलिंद कुराडे, अशोक भोसले, समीना गारदी, रशिदा मुजावर, शबाना मुल्ला, प्रतीक्षा वराळे, संज्योती नायकवडी, संध्या पवार, तेजस्विनी गुरव, दिपाली काशीद तसेच माजी नगरसेवक रविंद्र तोरसे, माजी उपनगराध्यक्ष रविंद्र धडेल, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब मोकाशी, मारुती गवळी, अनुप गवंडी, जीवन पाटील, चेतन भोसले, अमरसिंह भोसले, मारुती माने, सुनील काशीद आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमास नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. शिबिराच्या आयोजनासाठी नगरपरिषदेतील सर्व सन्माननीय नगरसेवक व नगरसेविकांनी सहकार्य केले.