Thursday, April 16, 2026
HomeUncategorized‘गोकुळ’कडून दूध खरेदी दरवाढ; ५ लाख शेतकऱ्यांना दिलासा

‘गोकुळ’कडून दूध खरेदी दरवाढ; ५ लाख शेतकऱ्यांना दिलासा

कोल्हापूर: 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ने म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी (दि. २० फेब्रुवारी) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

नव्या निर्णयानुसार, म्हैस दुधासाठी ६.० फॅट आणि ९.० एसएनएफ या निकषांनुसार प्रतिलिटर खरेदी दर ५२.५० रुपयांवरून ५३.५० रुपये करण्यात आला आहे. तर गाय दुधासाठी ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ या निकषांनुसार प्रतिलिटर दर ३४ रुपयांवरून ३६ रुपये करण्यात आला आहे. हे दर २१ फेब्रुवारीपासून लागू होणार असल्याची माहिती संघाकडून देण्यात आली.

या दरवाढीमुळे ‘गोकुळ’शी संलग्न सुमारे ५ लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार असून, महिन्याकाठी अंदाजे ७ ते ७.५ कोटी रुपयांचा अतिरिक्त मोबदला शेतकऱ्यांच्या हाती येणार आहे.

म्हैस दूध विक्री दरातही वाढ

दरम्यान, ‘गोकुळ’च्या म्हैस दूध विक्री दरात २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मात्र गाय दुधाच्या विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी सांगितले की, दूध उत्पादकांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम व्हावा आणि म्हैस व गाय दूध उत्पादकांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular