Saturday, April 18, 2026
HomePoliticalपन्हाळा पंचायत समिती सभापतीपदी रवींद्र पाटील, उपसभापतीपदी भारती पाटील बिनविरोध

पन्हाळा पंचायत समिती सभापतीपदी रवींद्र पाटील, उपसभापतीपदी भारती पाटील बिनविरोध


पन्हाळा प्रतिनिधी – पन्हाळा पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे रवींद्र पाटील (काटे भोगाव) यांची, तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती शिवाजी पाटील (माले) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

या नव्या राजकीय समीकरणामुळे पन्हाळा तालुक्याच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीनंतर आमदार Chandradeep Narke आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष Babasaheb Patil यांनी पुढाकार घेत ही निवड अमलात आणली.

दोन्ही पक्षांमध्ये निवडणुकीपूर्वीच युती ठरली होती. पदांच्या वाटपाबाबतही एकमत झाले होते. ठरल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात सभापतीपद शिवसेनेकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार रवींद्र पाटील यांची सभापतीपदी निवड झाली. तर उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती शिवाजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

भारती पाटील यांच्या नेतृत्वातून महिला वर्गाला नेतृत्वाची नवी संधी मिळाल्याचे मानले जात आहे. या राजकीय समीकरणामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा पन्हाळा पंचायत समितीवर झेंडा फडकला असून जनसुराज्य शक्ती ची सत्ता संपुष्टात आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तालुक्यात नवीन राजकीय समीकरण उदयास येत असल्याचेही दिसून येत आहे.


RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular