Saturday, April 18, 2026
HomeSocialअमर काळे यांना ‘समाज भूषण’ पुरस्कार

अमर काळे यांना ‘समाज भूषण’ पुरस्कार

पन्हाळा प्रतिनिधी :
समाजातील न्याय, हक्क आणि समानतेसाठी सातत्याने कार्य करणारे राष्ट्रीय बहुजन महासंघाचे महाराष्ट्र राज्य सचिव अमर काळे यांना सन २०२५–२६ या वर्षासाठी ‘आदर्श समाज भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा सन्मान देण्यात आला.

महापुरुषांच्या विचारांची पताका खांद्यावर घेऊन समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, शासनाने भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून जनतेची कामे करावीत यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आणि समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र कार्यरत राहणे, या कार्याची दखल घेऊन सत्यशोधक महिला विचार मंच, महाराष्ट्र यांनी अमर काळे यांना हा पुरस्कार प्रदान केला.

समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देणे हे आपले कर्तव्य मानून त्यांनी आपले आयुष्य समाजकार्यासाठी समर्पित केले आहे. जनतेप्रती प्रेमभावना, मैत्रीपूर्ण वर्तन आणि न्यायासाठी असलेली तळमळ यामुळे त्यांनी जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.

या सन्मानाबद्दल राजीव सोरटे (अध्यक्ष व संस्थापक, राष्ट्रीय बहुजन महासंघ) यांनी आनंद व्यक्त करत अमर काळे यांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular