Friday, November 20, 2026
HomePoliticalमुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेच्या शाहूवाडी विधानसभा समितीच्या सह-अध्यक्षपदी प्रकाश देशमुख यांची...

मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेच्या शाहूवाडी विधानसभा समितीच्या सह-अध्यक्षपदी प्रकाश देशमुख यांची नियुक्ती

कोल्हापूर  :

मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेच्या शाहूवाडी विधानसभा मतदारसंघासाठी गठित करण्यात आलेल्या समितीच्या सह-अध्यक्षपदी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा आसुर्ले (ता. पन्हाळा) येथील रहिवासी प्रकाश बळवंत देशमुख यांची शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचा शासन निर्णय (जीआर) नुकताच प्राप्त झाला असून, जिल्हाधिकारी व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्याला या महत्त्वपूर्ण पदावर संधी मिळाल्याने शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी वर्गासह भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रकाश देशमुख यांनी भाजपमध्ये बूथप्रमुखापासून जिल्हा उपाध्यक्षपदापर्यंत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. पक्षाचे प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात वेगळी ओळख आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच पक्षवाढीसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच शासनाच्या या समितीवर त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे मानले जात आहे.

मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते उपलब्ध करून देणे, शेतीमालाची वाहतूक सुलभ करणे आणि ग्रामीण भागातील शेतरस्त्यांचा विकास साधणे ही महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. या पार्श्वभूमीवर देशमुख यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

या नियुक्तीसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक, आमदार अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, आमदार राहुल आवाडे, महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, प्रदेश सदस्य अजय चौगुले, तालुकाध्यक्ष अमर भोसले आणि युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत बुगले यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे प्रकाश देशमुख यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular