Sunday, September 13, 2026
HomeSocialकोल्हापूरच राजकारण ढवळून निघेल, बारा वर्षाची मुलगी आई बनेल,बाळूमामा मंदिरात डोणे महाराजांची...

कोल्हापूरच राजकारण ढवळून निघेल, बारा वर्षाची मुलगी आई बनेल,बाळूमामा मंदिरात डोणे महाराजांची भाकणूक

मुदाळतिटटा /प्रा.शिवाजी खतकर

महाराष्ट्र,कर्नाटक,गोवा,कोकण,व अन्य राज्यातील लाखो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री.क्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड )येथील सद्गुरु बाळुमामांचा वार्षिक भंंडारा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी,(जागरा दिवशी)विविध धार्मिक कार्यक्रमांनी लाखो भाविकभक्तांच्या उपस्थितीत पार पडला.
गेली सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांच्या भक्तीमय वातावरणात,भंडा-याच्या मुक्त उधळणीत ,ढोल-कैताळांच्या गगणभेदी आवाजात,फटाक्यांच्या आतशबाजीत आणि बाळुमामांच्या नावानं चांगभल च्या जयघोषात श्रीक्षेत्र आदमापूर नगरी भंडा-याच्या मुक्त उधळणीत भंडारमय झाली.
उत्सवानिमित्त जागरादिवशी बाळूमामांचा गाभारा जरबेरा,आॕरखीड,कार्नेशियन,जिप्सो,डच,गुलाब ,पुष्पामेघ अशा विविध रंगाच्या, विविध आकाराच्या १० ते १५ प्रकारच्या फुलांनी आकर्षकपणे सजवला होता..
तसेच रांगोळी काढणा-या कलाकारांनी विविध रंगातील रांगोळी मंदिरासमोर साकारली होती.
विविध भागातील किर्तनकार, प्रवचनकार यांची किर्तने,प्रवचने,भजनी मंडळांची भजने,धनगरी ढोल,यांच्या निनादात आणि मोठ्या भक्तीमय,उत्साही वातावरणात भंडारा उत्सव झाला.जागरादिवशी रात्री उशिरा भाविकांनी श्रीं च्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे
कृष्णात डोणे वाघापूरे यांचा भाकणुकीचा (भविष्यवाणी)कार्यक्रम झाला.यावेळी धनगरी गाणी,ओव्यांच्या गायनाने भाविकभक्त तल्लीन झाला होता.

: श्रीक्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड )येथील सद्गुरु बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात जागरा दिवशी पहाटे
संत बाळूमामा मंदिरा समोर केलेल्या भाकणुकीचा (भविष्यवाणी ) गोषवारा असा :
भारत देश संपूर्ण हिंदू राष्ट्र बनेल…. हिंदू धर्माची संस्कृती बाहेरील देश आत्मसात करतील,
देशात समान नागरी कायदा येणार,राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल,
आदमापूर हे गाव दुसरी काशी आहे,बाळू धनगराचा वाडा बघण्यासाठी जगातून माणसे येतील,माझ्या वाड्याच्या पायऱ्या सोन्याच्या होतील,
नदी जोड प्रकल्प येईल दुष्काळी भागात नंदनवन होईल, राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल ,कोल्हापूरचं राजकारण ढवळून निघंल,देशात नवीन कायदा येणार,मोठी महामारी येईल,उष्णतेच्या मोठ्या लाटा येतील, नदी जलाशय सगळे आटून जातील, होईल होईल जलप्रलय होईल, जलाशयाला मोठं भगदाडं पडंल, वादळ, भूकंप याने जगाची उलथापालथ होईल, भुईकंप होईल,
गावातला मनुष्य जंगलात राहील,
शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील, त्यांचा जयजयकार होईल,हिंदू धर्माची पताका जगात मिरवेल,
महागाईचा भस्मासूर येईल, सामान्य माणसाला जगणं मुश्कील होईल, पैशाच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळेल. उन्हाळ्याचा पावसाळा होईल अन् पावसाळ्याचा उन्हाळा होईल,तुम्ही माझी करशीला सेवा तर खाशीला मेवा, नीतिमत्तेनं राहशीला तर सुखात राहशीला, आदमापूरच्या लोकांनी एकत्र रहा,ज्याच्याकडे धान्य तो शहाणा होईल. वैरणीला सोन्याची किंमत येईल,धान्यांची व वैरणीची चोरी होईल. बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. बैलाची किंमत बकऱ्याला येईल. छ. शिवाजी महाराज कोणाच्यातरी पोटी जन्माला येतील
बाळुमामाचा राजवाडा बघायला जग दुनियातुन लोक येतील, महागाईचा भस्मासूर सुटल,मेघराजाची तुम्ही वाट बघशिला, वादळ, भुकंपाने या जगाची उलथापालथ होईल.माझी करशिला सेवा तर खाशिला मेवा. सोन्या चांदीच भाव वाढत जातील. लाकडाची डोरली येतील.

मेघ राजा ताळतंत्र सोडेल सुनामी वादळ होईल मोठं नुकसान होईल भूकंप होतील जनतेला नुकसानीला सामना करावा लागेल
जंगलातले प्राणी पक्षी गावात येतील मनुष्य जंगलात राहायला जाईल बारा कोसावर दिवा दिसेल. गाव बाजार येईल आंतरराष्ट्रीय बाजारपेठा तेजी मंदीत राहतील.
हिंदू धर्माला चांगले दिवस येतील जगातील अनेक देश हिंदू धर्माची स्थापना करतील भारत देश हिंदुराष्ट्र होईल भारत मातेचा जयजयकार करा मी भारत मातेच्या रक्षणासाठी सदैव उभा राहीन
पुण्यापेक्षा पाप वाढला आहे मानवाला अठरा प्रकारचे आजार पडते विज्ञानाची प्रगती माणसासाठी घातक ठरेल मानवाचे आयुष्य कमी होईल बारा वर्षाची मुलगी आई बनेल.
जगात अनेक लोक हिंदू धर्माचा स्वीकार करतील हिंदू संस्कृतीला चांगले दिवस येतील गाई म्हशीचे भाव करणारे भेटतील दुधाचे दर वाढत राहतील मेंढीचे महत्व वाढेल. माझा भक्तगण गोतावळा वाढत जाईल माझ्या भक्ताची मेंढे माऊली ची सेवा करा दिवस चांगले येतील. आदमापुरचे प्रती पंढरपूर होईल करवीर पंढरपूर प्रमाणेच आदमापुर ला भाविकांची मांदियाळी दिसेल आदमापूरवर माझा आशीर्वाद राहील.
यावेळी धैर्यशील भोसले तसेच हजारो भाविकभक्त उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular