Sunday, April 19, 2026
HomePolitical“पराभव पचत नाही; ‘लुगड्याने म्हातारी होत नाही’ – चंद्रकांत पाटील यांचा जयंत...

“पराभव पचत नाही; ‘लुगड्याने म्हातारी होत नाही’ – चंद्रकांत पाटील यांचा जयंत पाटील यांना टोला”

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद व राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली महापालिका व जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता कायम ठेवण्याचा दावा केला होता. मात्र त्यांचे मनसुबे रोखत राष्ट्रवादीचे नेते आमदार  जयंत पाटील यांनी सत्ता घेतली. कोणावरही टीकाटिप्पणी न करता आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर भाषण न करता जयंत पाटील यांनी झेडपी वर मिळवलेली सत्ता ही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसते.

सांगली जिल्हा परिषदेवर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर महाविकास आघाडी व राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपला अध्यक्ष- उपाध्यक्ष विराजमान केला. महायुतीला बहुमत असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आपल्या सोबत घेण्यात जयंत पाटील यशस्वी झाले. मात्र भाजपची असलेली एकाधिकारशाहीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेनेच्या दोघा सदस्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. शिवाय विजयानंतर जयंत पाटील यांनी थेट चंद्रकांत पाटील यांच्यावर बोलणे टाळले.

मात्र, पराभवानंतर जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत चंद्रकांत पाटील यांनी भूमिका मांडत एक प्रकारे पराभव न पचल्याची पोहोचपावती दिली आहे. महायुतीमधील मित्र पक्षांच्या सदस्यांना फोडून सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला, मात्र ट्रम्पला हरवल्यासारखा महाआघाडीच्या नेत्यांचा अविर्भाव आहे, राजकारणात जे पराजय होत असतात, मात्र एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, अशा अस्सल गावरान भाषेत सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांना टोला लगावला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular