Friday, April 24, 2026
HomePoliticalजिल्हा परिषद शिक्षण व क्रीडा समितीची बैठक उत्साहात संपन्न

जिल्हा परिषद शिक्षण व क्रीडा समितीची बैठक उत्साहात संपन्न

शिक्षण व क्रीडा समितीची बैठक उत्साहात संपन्

कोल्हापूर, दि. 23 एप्रिल 2026 — कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण व क्रीडा समितीची बैठक  सौ. शितल प्रविण यादव (सभापती) यांच्या अध्यक्षतेखाली आज उत्साहात पार पडली. या बैठकीस समितीचे नूतन सदस्य, जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच मुख्यालयातील शिक्षण विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. मिना शेंडकर यांनी सादरीकरणाद्वारे विभागाच्या विविध योजना व राबविण्यात आलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढ, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले उपक्रम तसेच शाळांच्या प्रगतीचा आढावा मांडण्यात आला.

सभापती सौ. शितल यादव यांनी प्राथमिक शाळांमधील पटसंख्या वाढविणे, विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारणे आणि जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावणे यावर विशेष भर देत संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच दुर्गम भागातील शिक्षकांच्या उपस्थितीबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या-आपल्या तालुक्यात शैक्षणिक गुणवत्ता व पटवाढीसाठी विशेष प्रयत्न करावेत, तसेच संघटनांच्या प्रतिनिधींशी बैठक घेऊन विद्यार्थी व शिक्षकांच्या गणवेशासंदर्भातही योग्य तो निर्णय घ्यावा, अशा सूचना सभापतींनी दिल्या.

या बैठकीस श्री. एकनाथ पाटील, श्री. भगवान पाटील, सौ. उत्तरा शिंदे, सौ. स्नेहल वेल्हाळ, सौ. रेखाताई मुगडे, सौ. शुभांगी कुंभार आदी जि.प. सदस्य उपस्थित होते. शेवटी जि.प. सदस्य श्री. एकनाथ पाटील यांनी विभागाच्या योजनांचे व उपक्रमांचे प्रभावी आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. अध्यक्षांच्या परवानगीने बैठक समाप्त झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular