बहिरेश्वर प्रतिनिधी…
करवीर तालुक्यातील कसबा बीड या गावांमध्ये सरपंच पदासाठी पोट निवडणूक घेण्यात आली .या निवडणुकीमध्ये अत्यंत चुरशीने मतदान झालेले आहे .या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षामध्येच दोन गट पडल्यामुळे एकीकडे सूर्यवंशी गटातून विजय गावडे हे उमेदवार, तर सत्यजित पाटील गटाकडून संतोष मोरे हे उमेदवार या निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत .यामध्ये शिवसेना पक्षाचे उत्तमराव वरुटे तटस्थ,पंडित वरुटे शैलेश वरुटे,अमित वरुटे, प्रताप पाटील हे सूर्यवंशी गटासोबत तर तरुणाई ,सामाजिक कार्यकर्ते व सत्यजित पाटील गट एकीकडे अशी निवडणूक लढण्यात आली आहे .लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेले उत्तमराव वरुटे यांच्यावर झालेल्या अविश्वास ठरावामुळे लोकनियुक्त सरपंच लागलेली होती .आज ग्रामपंचायत पासून केंद्रापर्यंत प्रत्येक जण स्वतःच्या पक्षाला कसा फायदा होईल ? व स्वतःचा कार्यकर्ता कसा निवडून येईल ? याकडे सर्वांचे लक्ष राहिलेले आहे .पण विकास कामे व नागरिकांच्या समस्या याकडे लक्ष देणे हे तितकेच गरजेचे आहे .जिल्हा परिषद पाडळी खुर्द मतदारसंघातून झालेली निवडणूक या निवडणुकी मधून कसबा बीड गावातील राजकारणाला कलाटणी मिळाली .फक्त दीड वर्षे लोकनियुक्त सरपंच या पदासाठी कालावधी राहिलेला आहे .या दीड वर्षांमध्ये प्रामुख्याने पेयजल योजना ,फिल्टर हाऊसच्या माध्यमाने नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी,गावातील रस्ते असे अनेक विकास कामे काही अंशी प्रलंबित ? तर काही ठिकाणी झालेलीच नाही .या व अशा विविध असणाऱ्या समस्या कसबा बीड गावातील सोशल मीडियावर निवडणुकीच्या माध्यमातून चांगल्याच गाजल्या.या सर्वातून नेते एका बाजूला तर ग्रामस्थ एका बाजूला अशा भूमिकेतून या निवडणुकीतून अत्यंत चुरशीने व शांततेने 78.85 % मतदान झाले आहे .