Sunday, May 17, 2026
HomePoliticalमहाडिक व बंटी पाटील हे एकत्र येण्याच्या नुसत्या वावड्याच

महाडिक व बंटी पाटील हे एकत्र येण्याच्या नुसत्या वावड्याच

कोल्हापूर/दोनवडे (श्रीकांत पाटील):
गोकुळ वर 63 वर्षाच्या इतिहासात प्रथमच प्रशासक राज्य आले आहे जिल्ह्याची अर्थ वाहिनी समजले जाणारे गोकुळ तथा कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ यावर आपलेच प्राबल्य असावे यासाठी महायुती व महाविकास आघाडी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत घोडा मैदान लांब नाही 19 तारखेलाच हे सर्व कळेल पण महाडिक व बंटी पाटील हे एकत्र येण्याच्या नुसत्या वावड्याच ठरल्या आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांना शह देण्यासाठी हे सर्व असेल अशी चर्चा कार्यकर्त्यांच्यात सुरू आहे.

के.पी.-ए.वाय.’ एकत्र येतात तर मग ‘बंटी-महाडिक’ का नाही?; सतेज पाटलांच्या विधानाने कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आगामी कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण कसे असेल हीच उत्कंठा लागली होती. ती उत्कंठाच राहिली आहे हे दोन्ही घराणे एकत्र येण्याची आशा दुसरच राहिली आहे
कोल्हापूरचे राजकारण हे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील व जिल्ह्याचे नेते महादेवराव महाडिक यांचे पुतणे खासदार धनंजय महाडिक यांच्या यांच्याभोवतीच घोंगावत आहे

कोल्हापूरच नाहीतर महाराष्ट्राच्या राजकारणात आ. सतेज पाटील व खा. धनंजय महाडिक यांनी दबदबा ठेवला आहे. कोल्हापूरच्या राजकारणात गेल्या अनेक दशकांपासून ‘पाटील विरुद्ध महाडिक’ हा संघर्ष केंद्रस्थानी राहिला आहे. हा संघर्ष केवळ दोन घराण्यांमधील नसून तो वर्चस्वाचा आणि अस्तित्वाचा मानला गेला. मात्र, आता बदलत चालला आहे. राज्याच्या राजकारणात ज्या वेगाने उलथापालथ होत आहे, त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर जाणवू लागले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचे अर्थ वाहिनी असणारा गोकुळ कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ याला अपवाद नाही.
आमदार सतेज पाटील व खासदार धनंजय महाडिक दोघांची जुनी दोस्ती आहे. या दोघांनी एकत्र यावे अशी अपेक्षा कोल्हापूरच्या जनतेत आहे.
कोल्हापूरच्या रांगड्या मातीत आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा बँकेच्या बैठकीत चौफेर फटकेबाजी या नव्या परंपरेची साक्ष देते.कोल्हापूरची खरी ताकद ही इथल्या ‘सहकार’ क्षेत्रात आहे. ‘गोकुळ’ दूध संघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बाजार समिती आणि अनेक साखर कारखाने ही जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे. अलिकडच्या काळात सहकार क्षेत्रासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. बदलती सरकारी धोरणे आणि जागतिक स्पर्धेच्या युगात या संस्था टिकवून ठेवणे हे कोणत्याही एका गटाचे काम राहिलेले नाही. अशा वेळी जर जिल्ह्यातील प्रमुख राजकीय शक्ती एकमेकांविरुद्ध लढण्यातच आपली ऊर्जा खर्च करणार असतील, तर या संस्थांचे नुकसान होण्याची भीती असते. त्यामुळेच, सतेज पाटील यांनी मांडलेला विचार हा सहकार क्षेत्र वाचवण्यासाठीचा एक ‘मर्मभेदी’ विचार ठरू शकतो.

कोल्हापूरच्या राजकारणात गेल्या अनेक दशकांपासून ‘पाटील विरुद्ध महाडिक’ हा संघर्ष केंद्रस्थानी राहिला आहे. महाडिक व आमदार आमदार सतेज उर्फ बंटी पाटील हा कोल्हापूरचा पॅटर्न महाराष्ट्राच्या राजकारणातही दिशादर्शक असेल

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular