Thursday, May 21, 2026
HomePolitical“Cockroach Janta Party” ची स्थापना; सोशल मीडियावर चार दिवसात १ करोड ९...

“Cockroach Janta Party” ची स्थापना; सोशल मीडियावर चार दिवसात १ करोड ९ लाख फॉलोवर्स

मुंबई, प्रतिनिधी : भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी १५ मे रोजी एका सुनावणी दरम्यान भारतातील तरुणांचा झुरळ असा उल्लेख केला. आणि याचाच आधार घेत किंवा या व्यवस्थेविरोधात बंड करण्यासाठी मराठवाड्यातील तरुण अभिजीत दिपके यांनी कॉक्रोज जनता पार्टी या नावाने सोशल मीडियावर पेज तयार केले. या पेजचे ४ दिवसात १ करोड 9 लाख फॉलोवर्स तयार झाले आहेत.
देशातील सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर उपरोधिक भाष्य करणाऱ्या “Cockroach Janta Party” या नव्या काल्पनिक मोहिमेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. इंस्टाग्रामसह विविध प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या पोस्टर आणि घोषणांमधून व्यवस्थेविरोधातील तरुणांचा संताप आणि व्यंगात्मक भूमिका समोर येत आहे.

व्यवस्था गटार आहे(“System Gutter Hai”) हा मुख्य नारा घेऊन सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत झुरळाचे प्रतीक वापरण्यात आले आहे. पोस्टरमध्ये “Jab system sadne lage, toh cockroach paida nahi hote… awaaz paida hoti hai,” असा संदेश देत सडलेल्या व्यवस्थेविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

युवकांच्या नाराजीचे प्रतीक

“Cockroach Seva Party” ही कोणतीही अधिकृत राजकीय संघटना नसून, ती सध्याच्या व्यवस्थेवर टीका करणारी एक डिजिटल आणि व्यंगात्मक मोहीम असल्याचे मानले जात आहे. पोस्टरमध्ये “Gen Z” असा उल्लेख करून बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई आणि प्रशासनातील अपयश यांसारख्या मुद्द्यांवर तरुणांचा रोष व्यक्त करण्यात आला आहे.

पोस्टरमध्ये संसद भवनाची पार्श्वभूमी, आंदोलन करणारी गर्दी आणि विविध घोषणा दाखवण्यात आल्या आहेत. “Hum gutter se darte nahi, saaf karte hain,” हा संदेश व्यवस्थेतील घाण साफ करण्याचे प्रतीक म्हणून वापरण्यात आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल

इंस्टाग्रामवरील “cockroachsevaparty” या पेजवरून ही मोहीम पुढे आणण्यात आली असून, अल्पावधीतच हजारो लोकांनी पोस्ट शेअर केल्या आहेत. अनेक युवकांनी या मोहिमेला “सिस्टमविरोधातील डिजिटल आंदोलन” असे संबोधले आहे.

काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या मोहिमेचे समर्थन करत “तरुणांच्या भावना मांडण्याचा अनोखा प्रयत्न” असे म्हटले आहे. तर काहींनी अशा प्रकारच्या प्रतिमांमुळे राजकीय वातावरण दूषित होऊ शकते, अशी टीकाही केली आहे.

राजकीय वर्तुळात चर्चा

या मोहिमेमुळे राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे. व्यंगात्मक पोस्टर आणि घोषणांच्या माध्यमातून जनतेचा असंतोष मांडण्याची नवी पद्धत म्हणून याकडे पाहिले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, सोशल मीडियाच्या युगात अशा मोहिमा युवकांवर मोठा प्रभाव टाकू शकतात.

दरम्यान, “Cockroach Seva Party” ही अधिकृत राजकीय पक्ष नसून ती केवळ व्यंग आणि सामाजिक भाष्य करणारी ऑनलाइन मोहीम असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular