कोल्हापूर प्रतिनिधी : खासदार छत्रपती शाहू महाराज व महाराष्ट्र विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते तथा कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार, कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीमध्ये स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नूतन शहराध्यक्ष प्रवीण केसरकर तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक यांच्या हस्ते स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांच्या कार्याला उजाळा देत त्यांना अभिवादन केले.
कार्यक्रमास कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष सचिन प्रल्हाद चव्हाण, राधानगरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हिंदुराव चौगुले, पन्हाळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवास पाटील, करवीर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील, माजी उपमहापौर संजय मोहिते, साहिल बागवान, ईश्वर परमार, गोकुळचे माजी संचालक उदय पाटील सडोलीकर, सचिन मारुती पाटील, एकनाथ मारुती चव्हाण, सागर चव्हाण, विश्वजीत पाटील सडोलीकर, धीरज मगदूम, संजय पाटील, सर्जेराव भोसले, लखन भोगम, प्रभाकर पाटील, सेवादल जिल्हाध्यक्ष रंगराव देवणे, युवराज भुयेकर, दत्ताजीराव वारके, आकाश शेलार, डॉ. प्रमोद बुलबुले, मतीन शेख, भारतीताई पोवार, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव वैशाली महाडिक, उज्वला चौगुले, चंदा बेलेकर, निर्मला सालढाणा, पूजा आरडे, संजय पटकारे, रघुनाथ चव्हाण, तानाजी पाटील, उदय फाळके, अथर्व पाटील, किशोर खानविलकर, संपतराव चव्हाण, संग्राम गायकवाड, कोल्हापूर शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय पोवार, रियाज सय्यद, प्रथमेश कांबळे, कार्यालयीन सचिव संजय पोवार वाईकर, शशिकांत पाटील, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष शुभम चव्हाण, रोहित पाटील, तानाजी लांडगे, बाबुराव कांबळे, युवराज पाटील यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.