पन्हाळा प्रतिनिधी : पन्हाळा येथील सोमेश्वर तलाव परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पन्हाळा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अतुल प्रकाश धुळे (वय 38, मूळ रा. सातार्डे, ता. पन्हाळा) हे सध्या पन्हाळा येथील सोमेश्वर तलावाच्या पलीकडे हनुमान मंदिराजवळ भाड्याच्या घरात राहत होते. गुरुवारी (दि. 28) सकाळी 7.30 वाजण्यापूर्वी त्यांनी राहत्या घरातील बेडरूममध्ये छताच्या हुकाला साडी बांधून गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
या घटनेची माहिती अरुण मारुती माळवी यांनी पोलिसांना दिली. प्राथमिक माहितीनुसार, मयत व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक मुल्ला करीत आहेत.