Saturday, May 30, 2026
HomeEducationअफरोज मोकाशीची मुंबई पोलीस दलात निवड; जिद्द आणि कष्टांना यशाचे फळ

अफरोज मोकाशीची मुंबई पोलीस दलात निवड; जिद्द आणि कष्टांना यशाचे फळ

पन्हाळा प्रतिनिधी : शहाबाज मुजावर

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पन्हाळ्यातील कु. अफरोज जावेद मोकाशी याची मुंबई पोलीस दलात निवड झाली असून, त्याने मोठे यश संपादन केले आहे. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही आईच्या कष्ट आणि स्वतःच्या जिद्दीच्या बळावर अफरोजने खाकी वर्दीचे स्वप्न साकार केले आहे.

मु.पो.ता. पन्हाळा येथील अफरोज मोकाशी याची मुंबई पोलीस पदासाठी निवड झाल्याने परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. घरची परिस्थिती प्रतिकूल असतानाही त्याची आई सायरा मोकाशी यांनी छोटे-मोठे काम करत मुलांचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यांना चांगले संस्कार दिले. शिक्षण घेत असताना अफरोजनेही शनिवार-रविवार तसेच मे महिन्याच्या सुट्टीत काम करत शिक्षण पूर्ण केले.

अफरोजचे प्राथमिक शिक्षण कुमार विद्यामंदिर, पन्हाळा येथे झाले. तर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पन्हाळा विद्यामंदिर येथे, तसेच बारावीपर्यंतचे शिक्षण संजीवन विद्यालयात पूर्ण झाले. शिक्षणासोबतच त्याने पोलीस भरतीसाठी सातत्याने सराव आणि अभ्यास सुरू ठेवला. मेहनतीच्या जोरावर अखेर त्याला यश मिळाले.

अफरोज हा शाहू क्रीडा मंडळ, पन्हाळाचा व्हॉलीबॉल खेळाडू असून, त्याने क्रीडा क्षेत्रातही विशेष प्राविण्य मिळवले आहे. त्याचे आजोबा शहीद मोकाशी यांनी नौदलात सेवा बजावल्याने देशसेवेचा वारसा त्याला लाभला आहे.

या यशामागे आई सायरा मोकाशी, भाऊ अरबाज, कुटुंबीय तसेच नातेवाईकांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे अफरोजने सांगितले. शिवछत्रपती पुरस्कार विजेते स्व. दिलीप जोशी, स्व. मुंतजर मुजावर, अकिब मोकाशी, सरफराज मोकाशी, वाहिद मोकाशी आणि मामा हेडकॉन्स्टेबल आयुब खान मुजावर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभल्याचेही त्याने नमूद केले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत मिळवलेल्या या यशामुळे अफरोज मोकाशीचे सर्वत्र कौतुक होत असून, युवकांसाठी तो प्रेरणादायी ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular