बालिंगे प्रतिनिधी:
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बालिंगे हायस्कूल,बालिंगे मध्ये भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . या उपक्रमात ”झाडे लावा झाडे जगवा” हा संदेश देत भारती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री विशाल वसंतराव जांभळे व संस्थेचे सेक्रेटरी श्री मधुकर जांभळे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक के. आर .पोवार सर, विद्यार्थी, शिक्षक ,संस्था पदाधिकारी यांनी शाळेच्या आवारात विविध प्रजातीच्या 50 रोपांची लागवड केली .
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देत भारती शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी श्री. मधुकर जांभळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते आपल्या भाषणात म्हणाले फक्त झाडे लावणे पुरेशी नाही तर त्याची निगा राखणे तितकेच गरजेचे आहे .वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी प्रत्येकाने माँ के नाम एक पेड किमान एक झाड लावून ते जगवले पाहिजे . तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल श्री. धनाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक श्री. के .आर. पोवार तसेच सामाजिक वनीकरण श्री. एस बी पाटील ,श्री .अमोल शिंदे तसेच वनसेवक आनंदा बरगे उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .एस. व्ही .ढेरे यांनी केले तसेच आभार श्री कळेकर ए. व्ही.
यांनी मांडले.