Sunday, June 7, 2026
HomePoliticalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील 108 रुग्णवाहिका वाहन चालकांवर केलेली शिस्तभंगाची कारवाई रद्द करा....जि...

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील 108 रुग्णवाहिका वाहन चालकांवर केलेली शिस्तभंगाची कारवाई रद्द करा….जि प अध्यक्षा शिल्पा खोत यांची मागणी

बहिरेश्वर प्रतिनिधी…

कोल्हापूर जिल्ह्यात भारत विकास ग्रुप यांच्या महाराष्ट्र इमर्रजन्सी मेडिकल सर्व्हिसेस या संस्थेमार्फत 108 रुग्णवाहिकांचे काम प्रभावी व पारदर्शक आहे..या संस्थेत वाहन चालक पदावर काम करणारे चालक आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता अहोरात्र आपली सेवा बजावत असतात.संदर्भीय संस्थेत महेंद्र महादेव कुडाळकर हे 2014पासुन रुग्णवाहिकेवर चालक म्हणून आपली सेवा बजावत होते पण त्यांना एक दुर्मीळ motor neron diseas आजार जडला..त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्यांना कंपनीकडुन मदत मिळावी या स्वच्छ व प्रामाणिक भावनेतुन वाहन चालक संघटनेकडून दि 21.05.2026 रोजी काही काळ काम बंद ठेवण्यात आले होते.याची दखल घेत सदर कंपनीने कुडाळकर यांना मोलाची मदत केली परंतू या काळात काम बंद केलेल्या कर्मचारी संघटनेतील चालक अमित मोरे,मजिद शेख,ज्ञानेश मोरे,अजय निकम, पांडुरंग ठमके,दिनेश गवळी,संजय कांबळे, संग्राम पाटील,अवधूत पाटील आदी चालकांवर शिस्तभंगाचा ठपका ठेवून कायदेशीर कारवाई ची नोटीस देण्यात आली आहे जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी याची दखल घेत सदर कंपनीस रूग्णवाहिका 108 चालकांवरील केलेली शिस्तभंगाची कारवाई रद्द करावी अशा आशयाचे पत्र विभागीय कार्यालयास पाठवले आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular