Sunday, June 7, 2026
HomeSocialपन्हाळगडावर ३५२ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

पन्हाळगडावर ३५२ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

पन्हाळा प्रतिनिधी , शहानवाज मुजावर
छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन साजरा होत आहे.आज पन्हाळगडावर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात आणि शिवमय वातावरणात पन्हाळगडावर साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शिवभक्तांची आज पन्हाळगडावर गर्दी होती.
प्रतिवर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज आणि मोघलमर्दीनी महाराणी ताराराणी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या किल्ले पन्हाळा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा थाटामाटात संपन्न झाला.
सोहळ्याची सुरवात गड पूजनाने व नगारखाना येथे भगवा ध्वज फडकावून झाली.यांनतर नरवीर वीर बाजीप्रभू देशपांडे व वीर शिवाकाशीद यांच्या पुतळ्याला हार,शिवमंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालून शिवमंदिर ते महालक्ष्मी मंदिर इथपर्यंत पारंपारिक पद्धतीचे वाद्य वाजवत मिरवणूक काढण्यात आली.लहान मुलांच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आले.खेळाच्या प्रदर्शनाने सोहळ्याला अधिकच रंगत आली होती.
यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख मा.विजय देवणे,जिल्हाप्रमुख नामदेव गिरी,जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले,पन्हाळा तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील,शहर प्रमुख मंजित माने,युवासेना जिल्हा प्रमुख स्वप्नील मगदूम,महिला आघाडी स्मिता सावंत,शहर प्रमुख जुनेद मुजावर ,प्रवीण शिंदे भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे (आप्पा),वैभव कोळी, छत्रपती घराण्याचे सेवक हानिफ नगारजी, सुभाष गवळी ,सर्व शिवसेने पक्षाचे पदाधिकारी, गडावरील नागरिक ,शिवभक्त पर्यटक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular