बालिंगा प्रतिनिधी (मोहन कांबळे):
बालिंगे हायस्कूल बालिंगे चे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय वसंतराव शामराव जांभळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त राजर्षी शाहू महाराज गौरव पुरस्कार प्रदान सोहळा बालिंगे हायस्कूल मध्ये आयोजित करण्यात आला होता या वेळी बोलताना करवीर चे आमदार चंद्रदीप नरके यांनी बालिंगे हायस्कूल बालिंगे चे विद्यार्थी आज महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक विभागांमध्ये तसेच प्रत्येक ठिकाणी कार्यरत असल्याने कुठलाही कामास अडचण येत नसल्याने याचा अभिमान वाटल्याचे सांगितले तसेच बालिंगा हे गाव कात्यायनी डोंगरात वसवले होते ते गांव येथे स्थलांतर करून शाहू महाराज यांनीआणले त्यावेळी अनेक लोकांच्या घरांच्या नावापुढे महाराष्ट्र शासन लागले होते त्या सर्वांच्या नावे मी आज करून दिले याचा मला अभिमान वाटतो असे उद्गार काढले. तसेच बालिंगे हायस्कूलचे विशाल जांभळे मधुकर जांभळे हे चांगल्या प्रकारे कार्य करत असल्याचे सांगितले.
यावेळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर.बी.कळमकर यांनी भाषणांमध्ये सांगितले की, बालिंगा हायस्कूल ने जो सत्कार केला आहे तो अभिनंदनीय आहेच संस्था कशी चालवायची व त्यातून कशाप्रकारे काम करायचे हे यातून दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले.
पत्रकार ताज मुलांनी व संजय पाटील मुख्य अभियंता यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले.
आमदार चंद्रदीप नरके व पोलीस निरीक्षक आर. बी. कळमकर यांच्या हस्ते सत्कारमूर्तींचे सपत्नीक सत्कार करण्यात आले.
आदर्श माता पालक राजेंद्र वसंतराव वागवेकर,
आदर्श दूध उत्पादक म्हणून अनिल महादेव यादव व कृष्णात वागवेकर, प्रगतशील शेतकरी सेवानिवृत्त बाबासो पांडुरंग जांभळे, आदर्श व्यवसायिक राजेंद्र बापुसाहेब कोरे, आदर्श शिक्षक शिवाजी धोंडीराम बागडी, आदर्श डॉक्टर डॉक्टर अनिल कांबळे तसेच आदर्श ग्रामसेवक म्हणून शिवाजी वाडकर आदर्श पत्रकार ताज मुलांनी, आदर्श उद्योजक सुशांत शिंदे त्याचबरोबर रायफल शूटिंग मध्ये चमकत असणारे निरंजन जांभळे, आदर्श सोसायटी शाहू विकास सोसायटी तसेच संजय पाटील व विद्यार्थी स्वरा ज्ञानेश्वर गवळी विघ्नेश सूर्यवंशी यांचाही सत्कार करण्यात आला त्याचबरोबर गरीब आणि होतकरू विद्यार्थी विद्यार्थ्यांना पुस्तके व वह्या वाटप आमदारांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सचिव मधुकर जांभळे संस्थेचे अध्यक्ष विशाल जांभळे तसेच खजानीस मारुती भवड, संचालक अशोक घोडके, श्रीकांत भवड, जनार्दन जांभळे, सरपंच संदीप सुतार, तंटामुक्त अध्यक्ष अनिल पवार , बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दिवसे,माजी सरपंच मयूर जांभळे तसेच बालिंगे गावचे संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन, नागरिक, विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.