कोल्हापूर/मोहन कांबळे
शेतकरी, दुधसंस्था व गोकुळ वाचविणेसाठीच आमचा प्रामाणिक लढा. असे उद्गागार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक ( गोकुळ) दुध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी राजर्षी शाहु शेतकरी समविचारी आघाडीच्या ठरावधारकांचा मेळाव्याला काढले तसेच आघाडीकडे १८५१ ठराव असुन कांहीनी या पुर्वी ठराव परस्पर दिले आहेत व दोन दिवसांमध्ये अजुनही देणार असल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले.
माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजूबाबा आवळे, राजीव आवळे आणि श्री दत्त सहकार समुहाचे अध्यक्ष गणपतरावदादा पाटील यांनीही आपले विचार या वेळी मांडले.यावेळी आघाडीकडून १,८५१ ठराव दूध विकास विभागाकडे सादर केले.
स्व. आनंदराव चुयेकर साहेबांनी उभारलेला गोकुळचा वारसा पुढे नेण्याची आमची बांधिलकी आहे. आमची लढाई सत्तेसाठी नसून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय, प्रतिष्ठा आणि त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आहे. आम्ही मल्टिस्टेटचा प्रयत्न हाणून पाडला, त्यामुळेच गोकुळच्या सातबाऱ्यावर दूध उत्पादकांचे नाव कायम राहिले. शेतकरी आणि दूध उत्पादक संस्था हा गोकुळचा पाया असून त्यांना वाचवण्यासाठीच आमचा लढा सुरू आहे. अशा भावना यावेळी सतेज उर्फ बंटी पाटील यांनी व्यक्त केल्या.
यावेळी जेष्ठ नेते गोपाळराव पाटील, रणजीतदादा मुरगुडकर, रामराजे कुपेकर, सत्यजित जाधव, राहुल देसाई, हिंदुराव चौगले, पी. डी. धुंदरे, ए. डी. पाटील, सदाशिव चरापले, अंजनाताई रेडेकर, एम. आर. पाटील- कुरुकलीकर, शशिकांत पाटील- चुयेकर, बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, उदय पाटील, दिनकरराव कांबळे, उदयानी साळुंखे, स्मिता गवळी, बजरंग पाटील, शामराव देसाई, संभाजीराव देसाई, दरगु गावडे, दयानंद पाटील, प्रशांत देसाई, निवास पाटील, भगवानराव जाधव, रामकृष्ण पाटील, रणधीर मोरे, छाया देसाई, एकनाथ पाटील, सचिन घोरपडे, जीवन पाटील, विक्रम चव्हाण- पाटील, विद्याधर गुरबे, गणपतराव डोंगरे, अमर पाटील, महेश पाटील- शिंगणापूरकर, शशिकांत खवरे, सम्राट मोरे, प्रकाशराव पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, विरोधी पक्षनेता राजू लाटकर, गटनेता इंद्रजीत बोंद्रे, मधुकर रामाणे, सर्व जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक व आजी- माजी पदाधिकारी आणि ठरावधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.