Sunday, July 5, 2026
HomeEducationशिक्षण क्षेत्रातील नवीन आव्हानांचा शिक्षकांनी अवलंब करावा :मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

शिक्षण क्षेत्रातील नवीन आव्हानांचा शिक्षकांनी अवलंब करावा :मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

मळगे खुर्द, दि. ५:
प्राथमिक शाळेतील पटसंख्या घटत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण होत आहे. गणित, विज्ञान,आणि इंग्रजी विषय प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा पाया आहे. या विषयाकडे शिक्षकांनी लक्ष केंद्रित करून अध्यापन करावे. सेवा निवृत्तीनंतरही शिक्षकांनी सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील योगदान सुरू ठेवावे. तसेच; आजच्या बदलत्या शिक्षण पद्धतीत नवीन आव्हानांचा स्वीकार करून शिक्षकांनी मराठी माध्यमांच्या शाळा टिकवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हहन मुश्रीफ यांनी केले.

भडगाव-कुरणी रोडषर केदार मल्टीपर्पज हॉल येथे झालेल्या
मळगे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक ए. एम. पाटील यांच्या सेवानिवृत्त सदिच्छा कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कागल पंचायत समितीचे माजी उपसभापती आनंदराव अस्वले होते.

सेवानिवृत्ती निमित्त मुख्याध्यापक ए. एम. पाटील यांचा सहपत्नीक सत्कार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर, शिक्षक नेते दादा लाड, डॉ. जी. बी. कमळकर, राजेखान जमादार यांनी मनोगत व्यक्त केले.

या वेळी के. डी. सी. सी.बॅक संचालक भैया माने, गोकुळ संचालक युवराज पाटील, व्ही जी.पोवार, रंजना अस्वले, मालुताई पाटील, निवृती परबकर, देवानंद पाटील, पै.रविंद्र पाटील, रणजित मुडूकशिवाले, बी.ए.तळेकर, रघुनाथ अस्वले, ए. एच. सय्यद, बी.एस.खामकर आदी उपस्थित होते.

स्वागत प्रास्ताविक यांनी एस. जी. गोल्हार केले. निवेदन विवेक गवळी केले. आभार एस. के.फराकटे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular