Thursday, July 9, 2026
HomeAdministrationमुंबईतील सहसंचालक (खरेदी) पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. दिलीप माने यांच्याकडे

मुंबईतील सहसंचालक (खरेदी) पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. दिलीप माने यांच्याकडे

कोल्हापूर :  सार्वजनिक आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने यांच्याकडे मुंबई येथील सहसंचालक, आरोग्य सेवा (खरेदी) या महत्त्वाच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. राज्य शासनाने याबाबत आदेश जारी केले आहेत.

मुंबई येथील सहसंचालक (खरेदी) हे पद २० मे २०२६ पासून रिक्त होते. या पदाचा तात्पुरता अतिरिक्त कार्यभार महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाचे जनरल मॅनेजर डॉ. संजीवकुमार जाधव यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र, त्यांच्या विद्यमान कामाच्या वाढत्या व्याप्तीमुळे त्यांनी अतिरिक्त जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. त्यानुसार शासनाने हा कार्यभार आता डॉ. दिलीप माने यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. माने हे सध्या सार्वजनिक आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक म्हणून कार्यरत असून त्यांच्या अखत्यारित कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे प्रशासकीय कामकाज येते. या चार जिल्ह्यांतील आरोग्य सेवांचे नियोजन, अंमलबजावणी, देखरेख आणि विविध शासकीय आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी ते यशस्वीपणे सांभाळत आहेत.

आता त्यांच्याकडे मुंबई येथील सहसंचालक (खरेदी) पदाचा अतिरिक्त कार्यभार आल्यामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागासाठी औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि इतर आवश्यक साहित्य खरेदी प्रक्रियेच्या समन्वयाची जबाबदारीही त्यांच्यावर असणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाचा लाभ या पदाच्या कामकाजासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular