पन्हाळा | प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील यवलूज येथे विनापरवाना सुरू असलेल्या आरागिरणीवर वनविभागाने धडक कारवाई करत आरागिरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मंगळवारी (दि. ७ जुलै २०२६) सहाय्यक वनसंरक्षक (वनी व कॅम्पा) कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पथकाने मौजे यवलूज येथे छापा टाकला. यावेळी श्री. संदीप शंकर सुतार यांच्या मालकीची ३६ इंची आरागिरणी आवश्यक परवान्याशिवाय सुरू असल्याचे आढळून आले.
याप्रकरणी महाराष्ट्र वन नियमावली, २०१४ मधील कलम ५३(१०)(अ) अन्वये वनरक्षक अमर माने यांनी आरागिरणी चालक संदीप शंकर सुतार (रा. यवलूज, ता. पन्हाळा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
ही कारवाई उपवनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक (वनी व कॅम्पा) प्रियंका दळवी आणि वनक्षेत्रपाल पन्हाळा अजित माळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत वनपाल (मानवाड, अतिरिक्त कार्यभार बाजारभोगाव) रुपाली बुचडे, वनरक्षक अमर माने (कळे), अश्विनी मदने (पणुत्रे), रमेश पाटील (कोलिक), संजय पाटील (बाजारभोगाव), किरण पाटील (कोतोली), वनसेवक राजन भंडारी तसेच आरआरटी पन्हाळाचे सदस्य किरण कुंभार, संभाजी चौगले, अभिजित पाटील, अजिंक्य बच्चे आणि रोहित जाधव यांनी सहभाग घेतला.