Thursday, July 23, 2026
HomePoliticalअजितदादा समाजाचे प्रेरणा स्थान: राहूल पाटील

अजितदादा समाजाचे प्रेरणा स्थान: राहूल पाटील

खुपीरे (प्रतिनिधी) : स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त करवीर तालुक्यातील खुपीरे येथील ग्रामीण रुग्णालयात मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन राहुल पी. पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत होत्या.

यावेळी बोलताना राहुल पाटील म्हणाले, “स्व. अजितदादा पवार हे समाजाचे आशास्थान आणि प्रेरणास्थान होते. त्यांनी समाजहित, शेतकरी आणि सहकार क्षेत्राचा व्यापक विचार करून विकासकामांना गती दिली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे साखर उद्योगाला चालना मिळाली. त्यांच्या नेतृत्वाची उणीव आजही समाजाला जाणवते. युवकांसाठी ते प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते.”

जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी आपल्या मनोगतात स्व. अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीमुळे राज्याच्या विकासाला मोठी चालना मिळाल्याचे सांगितले. त्यांचे विचार समाजासाठी कायम प्रेरणादायी राहतील, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे नियोजन प्रवीण पाटील यांनी केले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, गोकुळ चे माजी संचालक बाळासाहेब खाडे,पंचायत समिती सभापती साताप्पा पाटील, सदस्य आशा पाटील, लता दिंडे, दत्त सेवा संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, उपाध्यक्ष आनंदा पाटील, गटविकास अधिकारी भंडारी, उपसरपंच सागर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उत्तम मदने तसेच ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वर्षा जाधव यांनी केले, तर प्रस्तावना महेश्वरी पाटील यांनी मांडली. आभार डॉ. धनंजय पाटील यांनी मानले.

या मोफत रोगनिदान शिबिराचा सुमारे २५० रुग्णांनी लाभ घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular