Saturday, August 1, 2026
HomeCrimeकरवीर पोलिसांकडून घरफोडी प्रकरणाचा छडा; दोन आरोपी अटकेत

करवीर पोलिसांकडून घरफोडी प्रकरणाचा छडा; दोन आरोपी अटकेत

कोल्हापूर, दि. १ ऑगस्ट : करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडी व चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे ₹42,500 किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सर्व पोलीस ठाण्यांना अशा गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने गुन्हा रजिस्टर क्रमांक ४११/२०२६ च्या तपासादरम्यान संशयिताचा शोध सुरू केला.

तपासादरम्यान प्रसाद अजित मिसाळ (वय १९, रा. शिंगणापूर, कोल्हापूर) हा त्याच्या राहत्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या प्रसादने कसून चौकशीनंतर त्याचा साथीदार साहिल सचिन सोनुले (रा. गणेशनगर, चंबुखडी, शिंगणापूर) याच्यासह शांकबरी कॉलनीतील एका घरात वेळोवेळी चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपींच्या ताब्यातून दोन टीव्ही, होम थिएटर, गॅस शेगडी, गॅस सिलेंडर तसेच इतर घरगुती साहित्य असा एकूण ₹42,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल रणजित पाटील करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच गुन्हे शोध पथकातील रणजित पाटील, विजय तळसकर, महेश बांबळे, प्रदीप यादव, गणपत पवार, प्रविण बोरचाटे, आत्माराम शिंदे, सोमराज पाटील, योगेश शिंदे, अमोल चव्हाण, प्रकाश कांबळे, अभिजीत कांबळे आणि श्रीधर जाधव यांनी पार पाडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular