बालिंगा: मोहन कांबळे
हिंदू पंचांगानुसार मराठी वर्षातील अत्यंत पवित्र आणि सणांचा राजा मानला जाणारा पाचवा महिना म्हणजेच ‘श्रावण महिना’ यंदा १३ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होत आहे. या पवित्र महिन्यात भगवान भोळ्या शंकराला प्रसन्न करण्यासाठी भाविक मनोभावे पूजा-अर्चा करतात.
पंचांगानुसार, यंदाचा श्रावण महिना १३ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू होईल आणि ११ सप्टेंबर २०२६ रोजी संपेल. श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व असून या काळात महादेवाची आराधना आणि शिवमुष्टी व्रताला मोठे प्राधान्य दिले जाते.
यंदा श्रावणात ४ सोमवार
श्रावण महिन्यातील सोमवारच्या व्रताला (श्रावणी सोमवार) शिवभक्तांमध्ये विशेष महत्त्व असते. यंदाच्या श्रावण महिन्यात एकूण ४ सोमवार येत असून त्यांच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत:
पहिला सोमवार: १७ ऑगस्ट २०२६
दुसरा सोमवार: २४ ऑगस्ट २०२६
तिसरा सोमवार: ३१ ऑगस्ट २०२६
चौथा सोमवार: ७ सप्टेंबर २०२६
या संपूर्ण महिन्यात मंदिरांमध्ये आणि शिवाल्यांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. १३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या पवित्र महिन्यासाठी आतापासूनच भाविकांमध्ये आणि मंदिरांमध्ये तयारी सुरू झाली आहे.